Nagpur Student | धक्कादायक! नागपूरमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये विनापरवानगी विद्यार्थ्यांचा प्रवेश
नागपूरमध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये काही विद्यार्थी कागदपत्र घेण्यासाठी आले होते या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली (Student in Quarantine Center Nagpur) आहे.
नागपूर : नागपूरमध्ये अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था केलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये काही विद्यार्थी कागदपत्र घेण्यासाठी आले होते. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली (Student in Quarantine Center Nagpur) आहे. नागपूर लॉ कॉलेज शेजारी असलेल्या वसतीगृहात क्वारंटाईन सेंटर आहे. या सेंटरमध्ये आतापर्यंत अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या सेंटरमध्ये हे विद्यार्थी आपली कागदपत्र घेण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे एक विद्यार्थी फक्त तोंडाला रुमाल बांधून आत आला (Student in Quarantine Center Nagpur) होता.
नागपूर क्वारंटाईन सेंटरमधून आतापर्यंत अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशा परिस्थितीतही या विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला कुणी, विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली तर याला जबाबदार कोण, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
विद्यार्थी क्वारंटाईन सेंटरमध्ये आले तेव्हा एका विद्यार्थ्याने पीपीई किट घातला होता. तर दुसऱ्याने फक्त तोंडाला रुमाल बांधला होता. या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये विद्यार्थी आपले कागदपत्र शोधत असल्याचे दिसत आहे.
लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वीच नागपूर विद्यापीठाचे वसतीगृह खाली करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. पण काही विद्यार्थ्यांचे कागदपत्र वसतीगृहात होते. तेच कागदपत्र नेण्यासाठी विद्यार्थ्यी क्वॉरंटाईन सेंटरमध्ये आले होते. पण अशा स्थितीत विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्यास, जबाबदार कोण? हाच सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, नागपूरमध्ये आतापर्यंत 921 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 555 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात जिल्ह्यात 58 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
संबंधित बातम्या :
नागपूरकरांना दिलासा, 13 वस्त्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित नाही, प्रतिबंध क्षेत्रातून वगळले
नागपूरकरांना दिलासा, हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुऱ्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त!