Success Story : दिवसा शेतीमध्ये राबली, रात्री अभ्यास केला अन् गोल्ड मेडल मिळवले

| Updated on: Jun 12, 2023 | 5:22 PM

जिद्द, परिश्रम करण्याची तयारी असली म्हणजे यश मिळतेच, हे पुन्हा सिद्ध झाले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील विद्यार्थीने औषधनिर्माण शास्त्रात सुवर्णपदक मिळवले आहे. दिवसा शेतीमध्ये काम करुन तिने यशाचा टप्पा गाठला आहे.

Success Story : दिवसा शेतीमध्ये राबली, रात्री अभ्यास केला अन् गोल्ड मेडल मिळवले
megha pawar
Follow us on

नंदुरबार : परिस्थितीची दोन हात करण्याची तयारी असली की कोणतेही यश तुम्हाला रोखू शकत नाही. मेहनत करण्याची तयारी असली की यश मिळतेच, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. या नावांमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. ही आदिवासी परिवारातील विद्यार्थीनी असून तिने आपल्या कर्तृत्वाने सुवर्णपदकाला गवसनी घातली आहे. दिवसा शेतीमध्ये कामे केली, ट्रॅक्टर चालवले अन् रात्री अभ्यास करुन विद्यापीठाचे सुवर्णपदक तिने मिळवले आहे.

कोण आहे मेघा पवार

नंदुराबार या दुर्गम जिल्ह्यातील मेघा गणेश पवार हिला कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्णपदक जाहीर झाले आहे. आदिवासी परिवारातील मेघाला हे यश सहज मिळाले नाही. त्यासाठी विपरीत परिस्थितीचा समाना तिला करावा लागला. शहादा तालुक्यातील मुबारकपूर गावातील मेघा पावर ही रहिवाशी आहे.

 

हे सुद्धा वाचा

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण

शिक्षणाची जिद्द अंगी असली तर परिस्थिती तिला थांबू शकत नाही, हे मेघा पवारने वारंवार सिद्ध केले. पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण तिचे गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर नंदूरबार शहर आणि जिल्हा बाहेर जाऊन हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षणाचा टप्पा गाठला.

शेतीत कामे करुन हातभार

मेघा फक्त अभ्यास एक अभ्यास करत नव्हती. घरच्या परिस्थितीची तिला जाणीव होती. यामुळे सुट्टीच्या दिवशी घरी आल्यावर शेतीत आई वडिलांना हातभार लावायची. ट्रॅक्टर चालवत होती. त्यानंतर दिवसभराच्या कामानंतर रात्री अभ्यास करत होती. या परिश्रमाचे फळ तिला मिळाले. तिने कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्रात गोल्ड मेडल मिळाले. मेघाचा आई-वडील भावंड असा परिवार आहे. या परिवाराची सर्व मदार शेतीवर अवलंबून आहे. तिच्या आई वडिलांची मुलीला उच्चशिक्षित करण्याची इच्छा होती. तिने ती यशाचे सर्वोच्च शिखर गाठत पूर्ण केली.

मेघा आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडिलांना आणि गुरुजनांना देते. आपल्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन आपलं नाव करावे, त्यासाठी लागणारा खर्च आम्ही कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू, असे तिचे आई-वडील म्हणतात.