जंगलात बसून पेपर सोडवण्याची विद्यार्थ्यांवर वेळ, नेटवर्क मिळेना म्हणून गडचिरोलीचे विद्यार्थी थेट छत्तीसगड सीमेवर

इंटरनेटचं कमी सिग्नल आणि अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगली फजिती झाली.

जंगलात बसून पेपर सोडवण्याची विद्यार्थ्यांवर वेळ, नेटवर्क मिळेना म्हणून गडचिरोलीचे विद्यार्थी थेट छत्तीसगड सीमेवर
Gondwana University Gadchiroli
Follow us
| Updated on: Mar 10, 2021 | 9:20 AM

गडचिरोली : इंटरनेटचं कमी सिग्नल आणि अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची (Gondwana University Gadchiroli) मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगली दमछाक झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला. काही विद्यार्थ्यांना तर नेटवर्क उपलब्ध न झाल्याने पेपर सोडवण्यापासून वंचित राहावे लागले. तर काहींनी जंगलात बसून पेपर सोडवला. (Student online Exam Siting Forest gondwana university over Due To internet Signal)

गोंडवाना विद्यापीठाच्या बी.एस्सी आणि बी.ए. या पदवी अभ्यासक्रमाची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहे. पण कोरचीत दोन दिवसांपासून मोबाइल नेटवर्कच नव्हते. त्यामुळे सोमवारी पेपर सोडविण्यासाठी नेटवर्क मिळवताना विद्यार्थ्यांना रानावनात भटकंती करावी लागली.

गडचिरोलीचे विद्यार्थी थेट छत्तीसगड सीमेवर…

नेटवर्कचा शोध घेत विद्यार्थी भटकताना दिसले. काहींनी 25 ते 30 किमी अंतरावरील गोंदिया जिल्ह्यातील चिंचगड, तर काहींनी छत्तीसगड सीमेवरील गावाजवळ जाऊन पेपर सोडविण्याचा प्रयत्न केला.

फक्त बीएसएनएलचं नेटवर्क…

कोरची तालुका निर्मितीपासून या तालुक्यात फक्त बीएसएनएलचं नेटवर्क आहे. येथील दूरसंचार विभागात एकही जबाबदार अधिकारी नाही. एका चौरीदाराच्या भरवशावर ग्राहकांना सेवा दिली जात आहे.

नेटवर्क नाही, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान

कोरोना संसर्गामुळे शहरात किंवा परगावी शिक्षण घेणारे विद्यार्थी आपापल्या गावाकडे आली आहेत. त्यांचेही ऑनलाईन क्लासेस सुरु आहेत. मात्र नेटवर्कच्या व्यत्ययामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय.

विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, विद्यापीठाची भूमिका

ऑनलाईन पेपर सोडवताना काही अडचण आल्यास संबंधित विद्यार्थ्यांनी प्राचार्यांमार्फत विद्यापीठाला कळवावं. त्यांचा पेपर पुन्हा घेण्याची व्यवस्था करण्यात येईल, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. तसंच परिपत्रकच विद्यापीठाने काढलं आहे. तांत्रिक कारणाने विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, असंही विद्यापीठाने स्पष्ट केलं आहे.

(Student online Exam Siting Forest gondwana university over Due To internet Signal)

हे ही वाचा :

पुणे विद्यापीठाच्या परीक्षा तारखेवर शिक्कामोर्तब, 11 एप्रिलपासून परीक्षेला सुरुवात, पाहा परीक्षा कशी होणार?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.