MPSC Preliminary Exam | MPSC परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर

पुणे, कोल्हापूर, जळगाव अशा शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. (postpone mpsc exam student protest)

MPSC Preliminary Exam | MPSC परीक्षा पुढे ढकलताच संताप आणि उद्रेक; पुणे, जळगाव, नागपुरात विद्यार्थी रस्त्यावर
राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधात घोणाबाजी करण्यात आली.
Follow us
| Updated on: Mar 11, 2021 | 6:05 PM

मुंबई : राज्य सरकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलताच (MPSC) विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्यात ठिकठिकाणी सरकारच्या या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जातोय. पुणे, कोल्हापूर, जळगाव अशा शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. (student opposes the decision of postponement of mpsc exam protest in diffeent district and city)

नियोजित वेळेप्रमाणे एमपीएससीची परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कित्येक वर्षांपासून परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्ष भाजपनेही विद्यार्थ्यांच्या भवितव्याला वेठीस धरणे योग्य नसल्याचे म्हणत महाविकास आघडी सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांत एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

कोल्हापुरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे पडसाद कोल्हापुरातही उमटले. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. या प्रकारमुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जळगावात विद्यार्थ्यांचा रास्तारोको

राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकल्यामुळे जळगावातील विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केला. येथे विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकात जमत रास्ता रोको केला. यावेळी 250 ते 300 विद्यार्थी उपस्तथित होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

नागपूर, सांगलीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये संताप

सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. सरकारच्या या निर्णयाचे पडसाद नागपूर आणि सांगलीमध्ये उमटले. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध केला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विध्यार्थी आणि विद्यार्थीनी अपस्थित होत्या.

दरम्यान राज्य सरकाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्यांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या काही नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी परीक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली.

इतर बातम्या :

Pune MPSC Student Protest | MPSC परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, पुण्यात राडा

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात गोपीचंद पडळकरांची एन्ट्री; रस्त्यावर आडवं पडून जोरदार घोषणाबाजी

MPSC Preliminary Exam | मोठी बातमी, राज्यसेवा पूर्व परीक्षा पुन्हा लांबणीवर

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.