Gram panchayat election Results 2022 : सोलापुरात सुभाष देशमुखांना धक्का, तर कराडमध्ये भाजपानं सत्ता राखली कायम

सोलापूर ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपाला मात्र मोठा धक्का बसल्याचे निकालावरून दिसून येत आहे. याठिकाणी सुभाष देशमुख यांच्याविरोधात सर्वच एकवटले. त्यामुळे देखमुख गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.

Gram panchayat election Results 2022 : सोलापुरात सुभाष देशमुखांना धक्का, तर कराडमध्ये भाजपानं सत्ता राखली कायम
ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवारांचा जल्लोषImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:26 PM

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीत (Solapur grampanchayat election) भाजपा आमदार सुभाष देशमुख यांना धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन्ही ग्रामपंचायतीत आमदार देशमुखांना हा धक्का बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी ग्रामपंचायतीतील सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) गटाची पंधरा वर्षाची सत्ता कोसळली आहे. आमदार सुभाष देशमुख गटाविरोधात सर्वपक्षीय नेते एकवटल्याने देशमुख गटाचा 6 पैकी एकच उमेदवार विजयी झाला आहे. सुभाष देशमुख गटाच्या पॅनेलला विरोधी गटाने धोबीपछाड दिली आहे. राज्यातील विविध 15 जिल्ह्यांमधील 62 तालुक्यातील 238 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 78 टक्के मतदान (Voting) झाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची 29 जून 2022ला घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या आहेत.

देशमुख यांच्याविरोधात सर्वच एकवटले

सोलापूर ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपाला मात्र मोठा धक्का बसल्याचे निकालावरून दिसून येत आहे. याठिकाणी सुभाष देशमुख यांच्याविरोधात सर्वच एकवटले. त्यामुळे देखमुख गटाला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले. त्यांचा सहापैकी एकच उमेदवार विजयी झाला. पक्षनिहाय आकडेवारी पाहू…

जिल्हा : सोलापूर, एकूण ग्रामपंचायत : 25

  1. शिवसेना – 2
  2. भाजपा – 1
  3. हे सुद्धा वाचा
  4. शिंदे गट – 0
  5. राष्ट्रवादी – 1
  6. काँग्रेस – 0
  7. इतर – 1

कराडला भाजपाच

कराडची कोयना वसाहत ग्रामपंचायत भाजपाकडे गेली आहे. याठिकाणी भाजपाच्या अतुल भोसले यांना सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे. 11 पैकी 10 जागी बाजी मारत दणदणीत विजय मिळवला आहे. तर एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही. त्यांचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

औरंगाबादेत काय स्थिती?

सिल्लोड तालुक्यात शिंदे गटाचा बोलबाला पाहायला मिळाला. सत्तारांच्या नेतृत्वात दोन ग्रामपंचायतींमध्ये सत्ता प्राप्त करण्यात यश आले आहे. अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातही शिंदे गटाने झेंडा फडकवला आहे. तीन पैकी 2 ग्रामपंचायतींवर शिंदे गटाची सत्ता आली आहे. नानेगाव आणि जंजाळ ग्रामपंचायतींमध्ये हा विजय मिळाला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.