सुब्रमण्यम स्वामी पंढरपूरला आले…कॉरिडॉरबाबत बोलले…गावकरीच काय मनसेचे पदाधिकारी म्हणाले बळ मिळालं
सरकारने जर बाळाच्या जोरावरती आमच्या जमिनी हस्तगत केल्या तर आम्ही यांना मतदान करणार नाही. असा इशारा देत नागरिकांनी विरोध कायम ठेवला आहे.
पंढरपूर : सुब्रमण्यम स्वामी यांनी नुकताच पंढरपूर दौरा केला आहे. पंढरपूर येथील कॉरिडॉरबाबत त्यांनी माहिती घेत, स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आहे. यामध्ये स्थानिक नागरिकांनी कॉरिडॉरला कडाडून विरोध केला आहे. त्याच दरम्यान सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबत थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाण साधला आहे. इतकंच काय महाराष्ट्रातील सरकारवर देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी टोला लगावला आहे. यामध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी चंद्रभागा नदी आधी स्वच्छ करा असा सल्लाच देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. त्यामुळे पंढरपूर येथील कॉरिडॉरचा मुद्दा पुन्हा तापला आहे. त्यामध्ये आता स्थानिक नगरिकांसह मनसेने देखील कडाडून विरोध सुरू केला आहे. यामध्ये मनसेचा सुरुवातीपासूनच पंढरपूर कॉरिडॉरला विरोध आहे असं पदाधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. पंढरपूर कॉरिडॉरसाठी जेसीबी आले तर सर्वात आधी मनसेचा पदाधिकारी आडवा जाईल असा थेट इशाराच मनसेच्या पदाधिकाऱ्याने दिला आहे.
व्यापाऱ्यांची घरं उध्वस्त करून तुम्ही कसला विकास करताय. सुब्रमण्यम स्वामी यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला लढण्यासाठी बळ मिळाले असे पंढरपुर येथील स्थानिक नागरिकांनी म्हंटले आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी आमच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले आहे. विकासाला आमचा विरोध नाही मात्र लोकांचा रोजगार हिरावून, घरं पाडून विकास करणे चुकीचे असं पंढरपूर येथील नागरिक म्हणाले आहे.
यापूर्वी 1980 साली दर्शन मंडपावेळी जे भूसंपादन झाले त्याचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही. त्यामुळे पंढरपूर कॉरिडॉरला आमचा विरोध कायम आहे असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सरकारने जर बाळाच्या जोरावरती आमच्या जमिनी हस्तगत केल्या तर आम्ही यांना मतदान करणार नाही. असा इशारा देत नागरिकांनी विरोध कायम ठेवला आहे.
मनसेचे संतोष कवडे, स्थानिक व्यापारी चंद्रकांत गायकवाड, स्थानिक रहिवासी प्राजक्ता बेणारे, अशोक सोनलकर, श्रीपाद मामेडवार यांनीयाबाबत आपले मत मंडत विरोध कायम ठेवला आहे.