शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला अटक

देशभर गाजलेल्या बीडच्या स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडे पुन्हा बेकायदेशीरपणे गर्भपात करत असल्याचं समोर आलं आहे (Sudam Munde again arrested for illegal abortion).

शिक्षा भोगून आल्यावर पुन्हा बेकायदेशीर  प्रॅक्टिस, स्त्री भ्रूणहत्येतील दोषी सुदाम मुंडेला अटक
Follow us
| Updated on: Sep 06, 2020 | 2:34 PM

बीड : देशभर गाजलेल्या बीडमधील स्त्री भ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडे याने शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा बेकायदेशीरपणे वैद्यकीय प्रॅक्टिस सुरु केल्याचं समोर आलं आहे (Sudam Munde again arrested for illegal abortion). बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने आज (6 सप्टेंबर) पहाटे परळीतील मुंडे हॉस्पिटलवर पोलिसांनी छापा टाकला. यात हॉस्पिटलमधील साहित्य जप्त करण्यात आलं आहे. तसेच पोलिसांनी सुदाम मुंडेला अटक केली आहे. तो डॉक्टर असलेल्या मुलीच्या नावाने स्वतः प्रॅक्टिस करत होता.

स्त्री भ्रूण हत्येप्रकरणी देशभर गाजलेल्या प्रकरणातील मुख्य दोषी डॉ. सुदाम मुंडेची न्यायालयाने वैद्यकीय पदवी कायमस्वरुपी रद्द केली आहे. मात्र तरीही त्याच्याकडून न्यायालयाचे सर्व आदेश धुडकावून पुन्हा प्रॅक्टिस सुरु होती. जिल्ह्यातील काही लोकांनी सुदाम मंडेच्या या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर अखेर आज पहाटे पोलिसांनी परळीतील नंदागौळ रोडवरील मुंडे हॉस्पिटलवर छापा टाकला. गेल्या 6 महिन्यांपासून सुदाम मुंडे बिनधिक्कतपणे प्रॅक्टिस करत होता. या हॉस्पिटलचा परवाना मुंडे याच्या डॉक्टर मुलीच्या नावाने आहे. असं असतानाही सुदाम मुंडे आपल्यावरील बंदीला झुगारुन प्रॅक्टिस करत होता.

या प्रकरणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्त्रीभ्रूण हत्येतील दोषीकडून पुन्हा प्रॅक्टिस होणं चिंताजनक आहे. त्याच्याविरोधात साक्ष देणाऱ्या साक्षीदारांचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे, असं मत वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केलं.

रोगप्रतिकारक औषधंही द्यायचा

सध्या सुरु असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अनेक खबरदारी घेतल्या जात आहेत. जिल्ह्यात सध्या 5 हजारांच्या जवळ बाधित रुग्णाचा आकडा पोहचला आहे. मात्र अशा स्थितीत सुदाम मुंडे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना मास्क वापरु नका असा सल्ला देत होता. तो रुग्णांना रोगप्रतिकारक औषधंही देत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, अवैध गर्भपातप्रकरणात परळीतील मुंडे हॉस्पिटलचे डॉक्टर सुदाम मुंडे आणि त्यांची पत्नी सरस्वती मुंडेंसह (Doctor Sudam Munde) महादेव पटेकर यांना बीड जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. डॉ. सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे, महादेव पटेकर यांना प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

याप्रकरणी 17 जण आरोपी होते. त्यापैकी जळगावच्या डॉक्टर राहुल कोल्हेचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे 16 जणांचा आज निर्णय अपेक्षित होता. त्याप्रमाणे डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे तसंच महादेव पटेकर या तिघांनाही 10 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांचा दंड ठोठावण्यात आला. तर पुराव्यांअभावी 11 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

काय आहे संपूर्ण प्रकरण? बीड जिल्ह्यातील परळी इथल्या डॉ. सुदाम आणि सरस्वती मुंडे यांच्या मुंडे हॉस्पिटलमध्ये 18 मे 2012 रोजी विजयमाला महादेव पटेकर या महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी आरोपी डॉक्टर दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र दोघेही फरार झाले होते. यानंतर परळी न्यायालयाने दोघांनाही 3 जुलैपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. अन्यथा सीआरपीसी कायदा 83 नुसार संपत्ती जप्तीची कारवाईचा इशारा दिला होता.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं मुंडे दाम्पत्याचा परवाना कायमचा रद्द केला होता. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी या दाम्पत्याला जामीन मंजूर झाला होता. मात्र सामाजिक संघटनांनी आंदोलनं करुन जामीन रद्द करण्याची मागणी केली.

यानंतर मुंडे दाम्पत्य स्वत: पोलिसात हजर झालं होतं. त्यांच्यावर खटला चालल्यानंतर 2015 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने त्यांना 4 वर्षे कैद आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हा खटला जिल्हा न्यायालयात सुरु होता. जिल्हा सत्र न्यायालयाने मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली.

टीव्ही 9 ने सर्वप्रथम स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण चव्हाट्यावर आणलं

2011-12 साली गाजलेल्या अवैध गर्भपात प्रकरणात डॉ. सुदाम मुंडे आणि त्याची पत्नी सरस्वती मुंडे या दोघांना बीड जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून 10 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. परंतु शिक्षेची काही दिवस शिल्लक असताना मुंडे दाम्पत्याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला होता. जामिनावर आलेल्या मुंडेने पुन्हा प्रॅक्टिस सुरु केल्याची माहिती समजताच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग आणि पोलिसांनी आज पहाटे छापा मारुन मुंडेला अटक केली. यामुळे राज्यात पुन्हा खळबळ माजली. 2011 साली स्त्री भ्रूण हत्येचं हे प्रकरण टीव्ही 9 नेच सर्वप्रथम चव्हाट्यावर आणलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती.

2012 साली विजयमाला पटेकर या महिलेचा गर्भपात डॉ. मुंडे याने केला होता. लिंगनिदान चाचणीत सदर महिलेच्या गर्भात स्त्री जातीचं अर्भक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुंडे याने गर्भपात केला. मात्र गर्भपातादरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने विजयमाला पटेकर या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले होते. चौकशीनंतर मुंडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल होताच हे दोघेही तब्बल दीड महिना फरार होते. देशभर फिरल्यानंतर मुंडे दाम्पत्यानी पोलिसांना शरण आले. पोलिसांनी अटक केल्यावर त्यांच्यावर अंडर ट्रायल खटला सुरू होता. अखेर 2019 मध्ये बीड जिल्हा न्यायालयाने दहा वर्षाची शिक्षा ठोठावली. मात्र मुंडे दाम्पत्यानी आधीच शिक्षा भोगल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जामीन मंजूर करवून घेतला.

परळीत काही मोजक्या रुग्णालयापैकी एक मुंडे रुग्णालय होते. गेली अनेक वर्षांपासून मुंडे रुग्णालयात गर्भपात सुरू होते. मुंडेंनी त्या काळात गर्भपातासाठी तब्बल तीन हजार 940 च्या जवळपास विक्रीडील या औषधांचा वापर केल्याचं चौकशीत समोर आलं होतं. एवढंच नाही तर गर्भपात केल्यानंतर त्याची व्हिलेवाट लावण्यासाठी अनेक कर्मचारी नोकरीवर ठेवले होते. गर्भपातानंतर भ्रूण स्वतःच्या शेतातील विहिरीत टाकायचा. रुग्णसंख्या वाढल्यानंतर भ्रूण घरात पोसलेल्या दोन कुत्र्यांना देखील खाऊ घालण्याचे क्रूर कृत्य मुंडे करायचा. 2011 साली परळी परिसरातील संगम नदीत 13 भ्रूण आढळल्याचे प्रकरण सर्वप्रथम टीव्ही 9 ने उघडकीस आणले होते. त्यानंतर हे प्रकरण खऱ्या अर्थाने  चव्हाट्यावर आले होते.

संबंधित बातम्या :

स्त्रीभ्रूण हत्येचा कारखाना, बीडच्या सुदाम मुंडे दाम्पत्याला 10 वर्षांची शिक्षा

Sudam Munde again arrested for illegal abortion

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.