Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

houses caught fire in Dharani : मेळघाटच्या धारणीत आगीचा भडका; तीन घरांना आग, 30 लाखांचे धान्य जळून खाक

या आगीत महेश आणि जगदीश मालविये यांच्या घराची राखरांगोळी झाली आहे. तर नेमकी आग कशामुळे लागली असावी याचे कारण अध्यापही कळू शकले नाही आहे.

houses caught fire in Dharani : मेळघाटच्या धारणीत आगीचा भडका; तीन घरांना आग, 30 लाखांचे धान्य जळून खाक
घरांना आगImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 11:53 PM

धारणी : अमरावतीच्या (Amravati) धारणी शहरात अचानक तीन घरांना आग लागल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना धारणी शहरातील होलीचंद भागात आज घडली. तर याघटनेत आगीचा भडका उडाल्याने दोन घरे जळून खाक झाली आहेत. तर सुमारे 30 लाखांचे धान्य (Grain) जळून खाक झाले आहे. तर घटनास्थळी अग्निशमन विभागाचे बंब (Fire Department Bomb) घटनास्थळी दाखल झाले असून आग अटोक्यात आणली जात आहे. दरम्यान धारणी शहरातील 20 दिवसात अशी आगीची ही घटना पुन्हा घडली आहे. रात्रीच्या वेळी ही आग लागली असल्याने सर्वदूर आगीचा प्रकाश पसरलेला दिसत होता.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मेळघाटच्या धारणी शहरात शासकीय विश्रामगृहाच्या मागे दोन घरांना अचानक भीषण आग लागली. दोन्ही ही घराच्या कामात जुन्या पद्धतीच्या सागाच्या लाकडांचा वापर करण्यात आल्याने आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच घरात साठवलेला हरभरासह साहित्य आगीत जळून खाक झाला. ज्याची अंदाजे किंमत 30 लाखांचे होते.

हे सुद्धा वाचा

दरम्यान धारणी शहरात मागील 20 दिवसात अशी घटना पुन्हा घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. तर रात्रीच्या वेळी ही आग लागली असल्याने त्या आगीचा प्रकाश सर्वदुर पसरलेला दिसत होता. विशेष म्हणजे पालिकेच्या 300 मीटर अंतरावर ही घटना घडली आहे. तर इतक्या जवळ घटना घडूनही अग्निशामक दल उशिरा घटनास्थळी पोहचले. त्यामुळे पालिकेच्या कारभारवर आणि अग्निशामक दलाच्या कारभारावर लोकांच्यात संतोष पहायला मिळत आहे. लागलेल्या या आगीत महेश आणि जगदीश मालविये यांच्या घराची राखरांगोळी झाली आहे. तर नेमकी आग कशामुळे लागली असावी याचे कारण अध्यापही कळू शकले नाही आहे.