Sudhir Mungantiwar | ‘दुर्योधन, दुःशासन म्हणत असतील हे मविआ सरकार आमचेही बाप’
नितेश व निलेश राणे यांच्यावर झालेल्या पोलीस (Police) कारवाईचा तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळालेल्या नोटिशीचा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी निषेध केला आहे.
नितेश व निलेश राणे यांच्यावर झालेल्या पोलीस (Police) कारवाईचा तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मिळालेल्या नोटिशीचा भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी निषेध केला आहे. भाजपा नेते व कार्यकर्त्यांना महाविकास आघाडी सरकार जाणून बुजून लक्ष्य करत असल्याचा आरोप त्यांनी केली आहे. हे सरकार चिरंजीवी नसून कायदा मात्र आहे, हे पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत. राज्यात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी भाजपा सर्वशक्तीनिशी लढा देत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहे. भष्टाचार करणाऱ्यांना शिक्षा झालेली आपण पाहिली मात्र भ्रष्टाचार उघड करणाऱ्यालाच नोटीस पाठवली जाते, हे जगातील एकमेव उदाहरण असल्याचे म्हणत हा अजब कारभार आहे, अशी टीका त्यांनी केली.