लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं, पावसातल्या सभेवरून मुनगंटीवार आघाडीवर धो-धो बरसले

राष्ट्रवादीकडून पावसातल्या सभेने खरं रान पेटवल्याचे आजपर्यंत सांगण्यात येतं. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेते यावरूनच राष्ट्रवादीला टोलेबाजी करत आहेत. आज सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungativar) यांनीही या सभेवरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं, पावसातल्या सभेवरून मुनगंटीवार आघाडीवर धो-धो बरसले
सुधीर मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला टोलाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 6:19 PM

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपासून पवारांची साताऱ्यातली पावसातली सभा (Sharad Pawar Rain speech) गाजतेय. राष्ट्रवादीकडून पावसातल्या सभेने खरं रान पेटवल्याचे आजपर्यंत सांगण्यात येतं. तर दुसरीकडे भाजप (BJP) नेते यावरूनच राष्ट्रवादीला टोलेबाजी करत आहेत. आज सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungativar) यांनीही या सभेवरून राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. पवारांच्या पावसातल्या सभेने निवडूण आलो म्हणून सांगता, तर लोकसभेसाठी पवारांनी 24 तास पावसात भिजावं, असे म्हणत त्यांनी चिमटे काढले आहेत. त्यामुळे सातारची ऐतिहासिक सभा पुन्हा चर्चेत आली आहे. लोकसभेत जिंकूनही खासदार उदयनराजे काही महिन्यातच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्याच जागेवर पुन्हा निवडणूक लागली. राष्ट्रवादीने यावेळी मात्र उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी चारी बाजुंनी बंदोबस्त लावला. त्यासाठी शरद पवारांचे खास मित्र श्रीनिवास पाटील यांना राजेंच्या विरोधात मैदानत उतरण्यात आलं.

पावसातल्या सभेनंतर काय घडलं?

श्रीनिवास पाटील यांचीच ही प्रचारसभा होती. पवार भाषणासाठी उभे राहिले आणि पाऊस सुरू झाला. मात्र तरीही पवारांनी माईक सोडलाच नाही. पडत्या पावसात पवारांनी मतदारांना साद घातली, तसेच गेल्या वेळी लोकसभेचा उमेदवार निवडण्यात माझ्याकडून चूक झाली हे पवारांनी स्टेजवरून जाहीर केलं. त्यानंतर राज्यातलं राजकारण बदलून गेलं. या सभेपासून राष्ट्रवादीच्या गोटातली नकारात्मकता नष्ट होऊन जणू नवी पालवीच फुडली. कारण निवडणुकीआधी डझन-दोन डझन नेते भाजपात दाखल झाले होते. त्यानंतर साहजिकच त्याचा परिणाम राजकीय वातावरण आणि कार्यकर्त्यांच्या मनवार झाला होता. मात्र सभेवेळी पाऊस बरसला आणि निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खात्यात मतं सुद्धा तशीच बरसली. बलाड्या उमेदवार असणाऱ्या उदयनराजेंना पराभूत करत श्रीनिवास पाटील तर साताऱ्यातून लोकसभा जिंकलेच. मात्र त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालवरही चांगलाच झाला. राष्ट्रवादीच्या 54 जागा निवडूण आल्या. बघता-बघता भाजपचा सेनेबरोबरचा घरोबा बिघडला आणि शिवसेनेची राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती झाल्याने राष्ट्रवादी सत्तेत आली.

मुनगंटीवारांचा पुन्हा जारोदार निशाणा

मात्र या निडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडूण येऊनही भाजप सत्तेपासून वंजित राहिली. मात्र लोकांनी त्यावेळी आम्हालाच निवडूण दिले होते, पण शिवसेनेने बेईमानी केल्याने आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागलं. अशी टीका भाजप नेते वारंवार करत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनीही पुन्हा त्याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे. एमआयएमच्या युतीच्या प्रस्तावानंतर हा मुद्दा आणखीच तापला आहे. शिवसेनेची संभाजीनगर असे औरंगाबादचे नाव बदलण्याची सिंह गर्जना कुठे गेली? 1988 मध्ये बाळासाहेबांनी सांगितलं होतं हे माझं वचन आहे. कुठे गेल ते वचन? असे म्हणत मुनगंटीवारांनी सेनेला सवाल केले आहेत. नवाब मालिकांचा राजीनामा तुम्ही घेऊ शकत नाही दाऊद इब्राहिमशी व्यवहार करणाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता, तसेच खरंच MIM च्या विरोधात असाल तर करा संभाजीनगर नाव दोन दिवसात, असे आव्हान मुनगंटीवारांनी शिवसेनेला दिलंय.

सभा पावसात, राजकारण पेटलं

गोपीचंद पडळकर यांनीङी पवारांच्या पावसातल्या सभेवरून जोरदार टोलेबाजी केली होती. पवार साहेब पावसात भिजूनही राष्ट्रवादीचे केवळ 54 आमदार निवडूण आले, अशी टीका पडळकरांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीनेही खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं होतं. शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला. त्यामुळे या सभेत जरी पाऊस बरसला असला तरी राजकारणात मात्र रान पेटलं आहे.

कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार? Rajesh Kshirsagar यांची नाराजी कायम; तर Jayashree Jadhav यांना अश्रू अनावर

Kolhapur North Assembly election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या मैदानात करूणा शर्मा, पंढरीतून फुंकलं रणशिंग

2 वर्षात तब्बल 38 Flatsची खरेदी! यशवंत जाधवांनी कधी काय घेतलं? 2 वर्षांची कुंडली tv9च्या हाती

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.