सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट सवाल; म्हणाले, पक्ष तुमच्या…

Sudhir Mungantiwar on Sharad Pawar Uddhva Thackeray Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या टीका केली आहे. त्यांनी काय म्हटलं? वाचा सविस्तर...

सुधीर मुनगंटीवार यांचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना थेट सवाल; म्हणाले, पक्ष तुमच्या...
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 8:27 PM

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेना आतापर्यंत तीन वेळा फुटली. व्यक्तिगत मालकीची सेना आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून स्वतःच नाव देण्याची गरज काय? शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे पक्ष मालकी हक्काचे पक्ष झाले आहेत. दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांचे पक्ष राहिला नाहीत. त्यामुळे ज्यांना पटत नाहीत ते बाहेर पडणारच…, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते पालघरमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

दोन्ही पक्षात शिल्लक राहिलेल्या आमदारांना नरेंद्र मोदींवर केलेली टीका आवडत नाही. सत्ता येणार असल्याचा साक्षात्कार झाल्याने अहंकार आणि घमेंड यांना आली आहे. त्यामुळे जेल मध्ये टाकण्या वलग्ना केल्या जात आहेत. रावणासारखी घमंड आली आहे. यांची सत्ता येणार नाही. किमान चार जून नंतर तरी सत्ता येणार असं तरी म्हणायला हवं होतं, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

काँग्रेसवर निशाणा

लाल चौकात भारताचा झेंडा जाळला जात असताना काँग्रेसचे पंतप्रधान तोंडाला फेविकॉल चिकटवल्यासारखे शांत बसायचे. परंतु आता मोठ्या दिमाखात तिरंगा लाल चौकात फडकत आहे. शरद पवारांना त्यांची सुकन्या सुप्रिया सुळे , उद्धव ठाकरे यांना आदित्यची तर सोनिया गांधींना राहुल गांधींची चिंता आहे. परंतु नरेंद्र मोदी फक्त आणि फक्त देशाच्या नागरिकांची चिंता आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

विरोधकांनावर टीकास्त्र

विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत,वैफल्यग्रस्त झाल्याने आशा द्धतीचे वक्तव्य केली जात आहेत. मोदी प्रधानमंत्री बनणार नाहीत अशी वक्तव्ये करून स्वतःच्या मनाचे समाधान करून घेत आहेत. परंतु ते खोटं समाधान आहे. 20 जागांवर लढणारे ठाकरे आणि दहा जागांवर लढणारे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील का? असा सवाल इंडिया आघाडीत अस्थिरता आहे, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलं आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.