शॉर्टसर्किटमुळे बीडमधील शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक, दहा लाखांचे नुकसान
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथल्या सुगाव (Sugav) या ठिकाणी तीन शेतकऱ्यांचा ऊस (sugarcane) जळून खाक झाला आहे. या घटनेमध्ये शेतकऱ्यांचे दहा लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान (Compensation) झाले आहे. विद्युत तारेच्या घर्षणाने ऊस जळाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पावासाने यावर्षी चांगली साथ दिली असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड केली आहे. मात्र असे नुकसान शेतकऱ्यांचे होत असेल तर शेतकऱ्याला काय फायदा होणार असा सवाल शेतकरी करीत आहेत.
आग लागून जळून खाक झालेला ऊस आता तोडणीला आला होता. मात्र त्यापूर्वीच विद्युत तारांच्या शॉर्टसर्कीट झाल्यामुळे शेतीतील सगळा ऊस जळून खाक झाला आहे. आगीत उसाचे मोठे नुकसान झाल्याने नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करून नुकसान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. नैसर्गिक संकटासह कोरोनाच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाल भाव मिळेनेही कठीण झाले आहे. राज्यात यंदा अनेक ठिकाणी पाऊस होऊन शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकटाचे सत्र सुरूच आहे. पावसामुळे आणि पाण्याअभाव्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करूनही शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आली नाही.
नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता कमी
बागायतदार शेतकऱ्यांनाही कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे. कोरोनाचे निर्बंधांमुळे मिळालेल्या शेतीमालाला योग्य बाजारभावही आणि विक्रीही झाली नसल्याने शेतीचा खर्चही त्यातून निघाला नाही. त्यातच विद्युत विभागाच्या गलथाण कारभारामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आख्खे मळे आगीच्या भस्मस्थानी पडत आहेत. आगीत ऊस जळून खाक झाला तरी त्याची नुकसान भरपाई मिळेलच याची खात्री कोणत्याच शेतकऱ्याला नाही. त्यामुळे राज्यीतील शेतकरी सध्या प्रचंड मोठ्या संकटात असल्याचे चित्र दिसत आहे.
संबंधित बातम्या