Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sujat Ambedkar : आम्हाला ”बी टीम” म्हणणाऱ्यांची विश्वासार्हता धोक्यात, पाहटेच्या शपथविधीवरून सुजात आंबेडकरांनी डिवचलं

सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांची पहिली वाहिली राजकीय सभा आज पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्तार, विरोधक सगळ्यांचा समाचार घेतला. त्याचवेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरूनही (Devendra Fadnavis Ajit Pawar oath) टोलेबाजी केली आहे.

Sujat Ambedkar : आम्हाला ''बी टीम'' म्हणणाऱ्यांची विश्वासार्हता धोक्यात, पाहटेच्या शपथविधीवरून सुजात आंबेडकरांनी डिवचलं
सुजात आंबेडकरांची राष्ट्रवादीवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 03, 2022 | 8:30 PM

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या पाठोपाठ युवानेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांची पहिली वाहिली राजकीय सभा आज पार पडली. या प्रसंगी सुजात यांनी पक्ष बांधणी, विस्तार, विरोधक सगळ्यांचा समाचार घेतला. त्याचवेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरूनही (Devendra Fadnavis Ajit Pawar oath) टोलेबाजी केली आहे. यावेळी ते म्हणाले, वंचितांची सत्ता स्थापन करायची असेल तर खूप जास्त मेहनत करावी लागेल. घरोघरी जाऊन आपला संपर्क वाढवला पाहिजे. वंचित भूमिका बाळासाहेबांची भूमिका ही नेमकी काय आहे? एक निवडक घटक सोडला तर इतर कोणत्या घटकांसाठी आहे याचा देखील प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. मागील दोन निवडणुकांमध्ये आपण पहिले फक्त आपल्या समाजातील ताकदीवर निवडणूक जिंकू शकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या समाजाव्यतिरिक्त इतर समजतील मतदाता जोडता आला पाहिजे. त्या परीने प्रयत्न करा. आपला समाज सोडून इतर समाजातील तीन व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीचा मतदाता म्हणून तयार करा, असे आवाहन त्यांनी केले.

पाहटेच्या शपथविधीने विश्वासहर्ता गमावली

पुढच्या निवडणुकीत अपयशाचं हे चित्र नक्की पालटलेलं असेल. प्रस्थापित पक्ष हे सिंडिकेट राजकारण करून वंचित वर्गाला वंचितच ठेवण्यात धन्यता मनात आहे. वंचित बहुजन आघाडीचा अपप्रचार करण्यासाठी पक्षाचा बी टीम म्हणून उल्लेख केला जात होता. मात्र पहाटेचे सरकार स्थापन करून विश्वासार्हता कोणी गमावली आहे याचा प्रत्येकाने विचार करावा. लाटेवरती स्वार होऊन कोणीही निवडणूक जिंकू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उत्तम उदाहरण आहे. मात्र यंदा आपल्या निवडणूक निव्वळ जिंकायची नसून मोठ्या प्रमाणात सत्ता देखील स्थापन करायची आहे, असे आवाहन त्यांनी केले.

मनसेवरही कडाडून टीका

तसेच अलीकडेच मी एक वक्तव्य ऐकलं मशिदीवर मोठे भोंगे लावले तर त्याठिकाणी हनुमान चालीसा वाचली जाईल. मी या विधानाला 100 टक्के पाठिंबा देतो फक्त अमित ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याचा शुभारंभ करावा याकरिता एकाही बहुजन माणूस नका जानवे घालून हनुमान चालीसा म्हणण्याला माझी हरकत नाही. माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती आहे, तुम्ही शरद पवारांची मुलाखत घ्या किंवा उभा पक्ष प्रस्थापित पक्षाच्या प्रचारासाठी उसना द्या मात्र तुमचा संपलेला पक्ष जातीय तेढ निर्माण करून होणाऱ्या दंगलीवर उभा करू नका. कायदा सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांसमोर केले आहे त्यामुळे दंगली झाल्या तर कोणाला अटक याबाबत संभ्रम नको. असा घणाघातही त्यांनी केला. येणारा काळ खूप अवघड आहे. आपल्याविरुद्ध खूप अपप्रचार केला जाणार आहे. निवडणूका जिंकण्यासाठी आपल्याकडे पैसा, रिसोर्सेस, ताकद नाही मात्र एक गोष्ट आहे ती म्हणजे जिद्द तुमच्यातील जिद्द पक्षाची ऊर्जा म्हणून काम करणारी आहे. चुनाभट्टीमधील राहुल नगर नंबर 1 कार्यालय उद्घाटन प्रसंगी सुजात आंबेडकर मुंबईत बोलत होते.

Ramdas Athawale : राज ठाकरेंच्या टीकेला पाठिंबा पण बरोबर घेण्यास विरोध, रामदास आठवलेंना नेमकं काय सांगायचंय?

TOP 9 Headlines | 3 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

Raj Thackeray Speech : ये रिश्ते टूट जायेंगे तो भारत टूट जायेगा, अबू आझमींचं राज ठाकरेंना शायरीतून प्रत्युत्तर

केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले
केबिनमध्ये शरद पवारांना बघून अजितदादा परतले, बैठकीत मात्र सोबत बसले.
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल
भारतीय भाषा दूरची का वाटते? मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला सवाल.
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न
'ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर..', भाजपकडून मनसेला डिवचण्याचा प्रयत्न.
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने
वाल्मिक कराडवरून भुजबळ - जरांगे आमनेसामने.
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला
'हात पुढे कराल आणि भविष्यात..', योगेश कदम यांचा राज ठाकरेंना सल्ला.
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.