Sujay Vikhe : अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडीने 50-50 लाख घेतले, सुजय विखेंचा आरोप, म्हणतात याची वसुली…

अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून भाजप खासदार सुजय विखे यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. याचंं सरकार होतं तेव्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मोठा पैसा लाटण्यात आला, असे सुजय विखे म्हणाले आहेत.

Sujay Vikhe : अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी महाविकास आघाडीने 50-50 लाख घेतले, सुजय विखेंचा आरोप, म्हणतात याची वसुली...
खासदार डॉ.सुजय विखे पाटीलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 5:12 PM

मुंबई : गेल्या काही काळात ठाकरे सरकारवर (Uddhav Thackeray) अनेक आरोप झाले आहेत. हे सरकार वसुली सरकार आहे, असेही आरोप भाजप सतत करत आल्याचे दिसून आले. त्यात फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मुंबई महापालिकेत कोविड कळात कसा भ्रष्टाचार झाला, याचा पाढाही आपल्या विधानसभेतल्या भाषणात वाचून दाखवला. तसेच खासकरून अनिल देशमुखांचं नाव सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात समोर आल्यानंतर  आणि त्यांच्यावर परमबीर सिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केल्यानंतर या आरोपांना आणखी हवा मिळाली. त्यात अधिकाऱ्यांचं बदल्यांचीही प्रकरणेही चांगलीच गाजली. मात्र अशातच अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून भाजप खासदार सुजय विखे यांनी पुन्हा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले आहेत. याचंं सरकार होतं तेव्हा अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी मोठा पैसा लाटण्यात आला, असे सुजय विखे म्हणाले आहेत.

बदल्यासाठी मोठी वसुली केली

महाविकास आघाडीमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 50 50 लाख घेतले गेले, असा थेट आरोप विखेंनी केलाय. तर तो अधिकारी सर्वसामान्य जनतेकडूनच दिलेला पैसा वसूल करणार आहे. त्यामुळेच ब्युरोक्रसीन केलेल्या वसुलीमुळे महागाई वाढली, असे म्हणत महागाईचं खापरही विखेंनी आता महाविकास आघाडीवरच फोडलं आहे.

राष्ट्रवादीचा शिवसेना संपण्याचा डाव

तर राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश होता की शिवसेना कशी संपवता येईल, पण मला आज आनंद की 40 आमदारांनी ती जाण ठेवत ते आमच्या सोबत आले. मी भाजपमध्ये आल्यानंतरही माझ्या प्रत्येक फ्लेक्सवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कायम ठेवला, ही माझी वैचारिकता आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.  आमदारांनी बंडखोरी केल्यापासून सतत त्यांच्यावर गद्दार म्हणून आदित्य ठाकरे टीका करत आहेत. त्यालाच सुजय विखेंनी हे प्रत्युत्तर दिलंय. तर आमदारांनीही आता आदित्य ठाकरेंवर सडकून टीका करत त्यांना थेट आव्हान द्यायला सुरू केलंय. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

मोदींच्या फोटोशिवाय निवडणुका लढवून दाखवा

तसेच अडीच वर्षे आम्ही भाकीत करत होतो, सरकार पडेल आता ते करत आहेत, ज्या पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून मंत मागितली आणि अचानक विधानसभा निवडणुकीनंतर फोटोतील व्यक्ती नकोसा झाला, त्यांनी निष्ठेची गोष्ट करावी हे हास्यास्पद आहे, अशी घणाघाती टीका सुजय विखेंनी ठाकरेंवर केली आहे. तसेच पंतप्रधानांच्या फोटो शिवाय निवडणूक लढवून दाखवा असे थेट आव्हान सुजय विखे यांनी दिलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.