तर तुमची दगदग होईल… कसा आहे तिन्ही मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक? वाचा सविस्तर
रेल्वे, लोकल ही मुंबईकरांची लाईफलाइन. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासाी कामासाठी ये-जा करत असतात. मात्र काही वेळा दुरूस्तीच्या कामांसाठी, देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात येतो. असाच ब्लॉक येत्या उद्या, अर्थात रविवार 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे.
मुंबई | 10 फेब्रुवारी 2024 : रेल्वे, लोकल ही मुंबईकरांची लाईफलाइन. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज लाखो प्रवासाी कामासाठी ये-जा करत असतात. मात्र काही वेळा दुरूस्तीच्या कामांसाठी, देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात येतो. असाच ब्लॉक येत्या उद्या, अर्थात रविवार 11 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारच्या दिवशी बाहेर पडायचं असेल तर आधी ब्लॉकच वेळापत्रक कस असेल ते जाणून घ्या, म्हणजे तुमची अडचण होणार नाही आणि दगदगही वाचेल.
कसं असेल ब्लॉकचं वेळापत्रक ?
माटुंगा – ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
कल्याण येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार/ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकदरम्यान कल्याण आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
डाउन धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ३.१८ वाजता सुटेल.
अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी ९.५५ वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी ३.२४ वाजता सुटेल.
सकाळी ११.०० ते ०५.०० या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत (बेलापूर-उरण आणि नेरुळ-उरण सेवा प्रभावित नाही) (नेरुळ/बेलापूर-उरण पोर्ट मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा बंद राहतील.
डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता असेल आणि पनवेल येथे सायंकाळी ४.३६ वाजता पोहोचेल.
अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.३६ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल सायंकाळी ४.१० वाजता असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी ४.०० वाजता असेल आणि पनवेल येथे दुपारी ०४.५२ वाजता पोहोचेल.
अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे संध्याकाळी ५.२० वाजता पोहोचेल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.