Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी साक्ष देतोय, आरोपी नाही; शिंदे गटाच्या वकिलाच्या ‘त्या’ प्रश्नावर सुनील प्रभू यांचा जोरदार आक्षेप

शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणात ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची आज पुन्हा साक्ष घेण्यात येत आहे. व्हीपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभू यांची साक्ष घेतली जात आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे प्रभू यांना प्रश्न विचारत आहेत. त्याला प्रभू यांच्याकडून उत्तरे दिली जात आहेत. आज दिवसभर ही सुनावणी सुरू राहील. त्यानंतर उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मी साक्ष देतोय, आरोपी नाही; शिंदे गटाच्या वकिलाच्या 'त्या' प्रश्नावर सुनील प्रभू यांचा जोरदार आक्षेप
महेश जेठमलानी, राहुल नार्वेकर आणि सुनिल प्रभू
Follow us
| Updated on: Nov 22, 2023 | 2:16 PM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 22 नोव्हेंबर 2023 : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशीही सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही बैठक सुरू आहे. काल ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष घेण्यात आली होती. आज पुन्हा एकदा सुनील प्रभू यांची फेरसाक्ष सुरू आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी हे सुनील प्रभू यांना सवाल करत आहेत. तर प्रभू प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देत आहेत. व्हीपच्या मुद्द्यावरून जेठमलानी यांच्याकडून प्रभू यांना सवाल केले जात आहेत.

सवाल जवाब काय?

सुनिल प्रभू : विधानसभेचा प्रतोद म्हणून मी व्हीप दिला होता.

जेठमलानी : 21 जून 2022 च्या पत्राकडे आपलं लक्ष वेधण्यात येत आहे. हे पत्र कुणाच्या अधिकारात देण्यात आल?

प्रभू : विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवायची होती. विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काही आमदार ट्रेस होत नव्हते. संपर्कात नव्हते म्हणून हे पत्र देण्यात आले.

जेठमलानी : हे पत्र कुणाच्या अधिकारात देण्यात आलं?

सुनील प्रभू : विधिमंडळ सदस्य पक्षाची मीटिंग बोलवायची होती. विधानपरिषेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव झाला होता. काही आमदार ट्रेस होत नव्हते म्हणजे संपर्कात येत नव्हते. म्हणून विधानसभेच्या सदस्यांची बैठक बोलवावी आणि माहिती घ्यावी म्हणून प्रतोद म्हणून मी हा व्हीप दिला होता.

जेठमलानी : 21 जून 2022 रोजी व्हीप पत्र कोणाच्या अधिकार अंतर्गत दिले गेलं?

प्रभू : 21 जून रोजी मिटींग बोलावायची होती. विधान परिषद निवडणूक एका उमेदवार पराभव झाला, तसच काही आमदार संपर्कात नव्हते. विधीमंडळ सदस्य बैठक बोलवून याबाबत माहिती घ्यावी यासाठी प्रतोद म्हणून बैठकीचा व्हीप दिला होता.

प्रभू : पक्षाचा प्रतोद म्हणून मी बैठकीचा व्हीप बजावला होता.

जेठमलानी : आपण हा व्हीप स्वतःच्या अधिकारात काढला होता, अस म्हणणं योग्य ठरेल?

प्रभू : विधान परिषद निवडणुकीत झालेल्या मत विभाजनानंतर शिवसेना पक्षाचे काही आमदार मिसिंग होते. त्यामुळे ही बैठक पक्ष प्रमुखांच्या आदेशानुसार बोलवायला सांगितली होती आणि त्यामुळे प्रतोद म्हणून मी व्हीप बजावला.

जेठमलानी : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हीप बाबत लिखित स्वरुपात सूचना केल्या होत्या की मौखिक स्वरूपात ठाकरे सूचना केल्या?

प्रभू : अशा बैठका तातडीन बोलवल्या जातात. त्यावेळेस टेलिफोनिक आदेश दिले जातात.

जेठमलानी : पक्षप्रमुखांनी आपल्याला लिखित स्वरूपात सूचना दिली होती का?

प्रभू : मी याचं उत्तर माझ्या लेखी उत्तरात दिलं आहे.

जेठमलानी : तुम्ही असं गोलगोल बोलू नका थेट बोला.

(सुनील प्रभू यांनी जेठमलानी यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला. मी साक्ष देतोय आरोपी नाही.)

प्रभू : अशा बैठकांचे आदेश हे फोनवरून दिले जातात.

जेठमलानी : पक्षप्रमुखांनी ही बैठक बोलवण्याचे आदेश मोबाईलवर तुम्हाला दिले की landline वर दिले? तेव्हा तुम्ही कुठे होता?

प्रभू : मी विधीमंडळ पक्षाच्या कार्यालयात होतो. निकाल लागून तीन चार तास झाले होते. आमदार गायबच्या बातम्या येत होत्या. तेव्हा तातडीची बैठक बोलवा असा फोन होता.

महेश जेठमलानी : कोणत्या दिनांकाला निवडणुकीची मतमोजणी संपली?

प्रभू : मला तारीख नाही माहीत ती. पण ऑन रेकॉर्ड आहे. माझ्या माहितीनुसार व्हीप बजावला त्याचा आदल्या दिवशी म्हणजे 20 तारीखला मतमोजणी होती.

प्रभू : त्यादिवशी 8.30 वाजता रिकाऊंटींग संपली असे मला वाटते. रिकाऊंटिंगमुळे उशीर झाला.

जेठमलानी : तुम्हाला वेळ आठवते का?

प्रभू : काऊंटींगवेळी माझ्या पक्षातील आमदार होते. मतविभाजन कुठे झालं याचा शोध आम्ही शोध घेत होतो. कागदावर काही गोष्टी मांडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पार्टी ऑफिसमध्ये दीड तास गेला.

जेठमलानी : तुम्ही पूर्ण कथा सांगत आहात.

प्रभू : मला वेळ तर द्यावं लागेल ना.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर : मूळ प्रश्नाचा गाभा समजून उत्तर द्या. वेळ कमी आहे.

प्रभू : ठिक आहे प्रयत्न करतो.

जेठमलानी : स्पेसिफिक उत्तर द्या

प्रभू : उशीर का झाला ते सांगावं लागेल ना?

जेठमलानी : वेळ सांगा कृपया.

प्रभू : 10.30 किंवा 11.30 ची वेळ होती. पक्षप्रमुखांचा फोन आला. पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवा असे सांगण्यात आले, त्यानंतर व्हीप तयार केला.

जेठमलानी : प्रश्न छोटा आणि सोपा आहे. अशी उत्तरे चालणार नाहीत.

नार्वेकर : उत्तर स्पेसिफिक ठेवा. सुनिल प्रभू तुम्हाला हे पुन्हा सांगण्यात येत आहे.

प्रभू : मी सत्य सांगतोय. 21 जून 2022 ला फोन आला. त्यानंतर पार्टी ऑफिसमध्ये व्हीप तयार केला. मग जे संपर्कात येत होते त्यांना देण्याची सुरुवात केली. रात्री 12 वाजले होते.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.