श्रीकांत शिंदे यांचा ड्रायव्हर, भाजी आणणाऱ्याला सुरक्षा, पण विरोधक वाऱ्यावर, सुनिल राऊत यांचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत. भरपूर नेते आहेत पण. मग दारूच्या नशेत संजय राऊत यांनाच धमकीचा मेसेज कसा जातो, असा सवाला सुनिल राऊत यांनी विचारलाय.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आलेल्या धमकीवरून त्यांचे बंधू सुनिल राऊत आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांना आलेली धमकी कुणीतरी मस्करी केली असेल. दारूच्या नशेत कुणीतरी मेसेज केला असेल अशा सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरून सुनिल राऊत यांनी मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुनिल राऊत यांनीच या धमकी प्रकरणात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. चाळीस आमदारांना दोन दोन गाड्या मागे पुढे ठेवलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे काही ड्रायव्हर आहेत त्यांचा भाजी आणणारा माणूस आहे त्यांना देखील सुरक्षा दिली आहे, मात्र विरोधकांना वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना सुरक्षा देण्यात आलेली नाही, असा घणाघात सुनिल राऊत यांनी केलाय.
सुनिल राऊत काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना सुनिल राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘ काल संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून व्हाट्सअप मेसेज आला होता. Ak 47 याने दिल्लीला किंवा कुठेही मुसावालाला ज्याप्रकारे मारलं तसं तसं उडवू अशी धमकी संजय राऊत यांना आली होती. या संदर्भात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
राऊतांनाच कसे मेसेज?
संजय राऊत यांना दारुच्या नशेत कुणीतरी मेसेज केल्याचं म्हटलं जातंय. यावरून सुनिल राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ दारूच्या नशेत फक्त संजय राऊत यांनाच कसे मेसेज येतात. महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत भरपूर नेते आहेत पण. मग दारूच्या नशेत संजय राऊत यांनाच धमकीचा मेसेज जातो.’
सहा महिन्यांपासून धमक्या
संजय राऊत यांना असे अनेक धमक्यांचे फोन माझ्या घरी गेल्या सहा महिन्यापासून येत आहेत, असा आणखी एक गौप्यस्फोट सुनिल राऊत यांनी केला. ते म्हणाले, ‘ वारंवार कंप्लेंट करून महाराष्ट्र शासनाने हे सर्व स्टंट म्हणून त्यावर ती लक्ष दिलं नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अशी सिक्युरिटी आम्हाला देईल DMr अपेक्षा नाही. सुरक्षा जरी मिळाली नाही तरी आम्ही शिवसेनेचे काम ठाम आणि मजबूतपणे करत राहू. चाळीस आमदारांना दोन दोन गाड्या मागे पुढे ठेवलेला आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे काही ड्रायव्हर आहेत, त्यांचा भाजी आणणारा माणूस आहे, त्यांना देखील सुरक्षा दिली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुरक्षा देणे महाराष्ट्र सरकारला परवडणारे नाही. अशी खोचक टीका राऊत यांनी केलीय.