अमित शाहांसोबत आज रात्री बैठक…; शपथविधीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले संकेत

Sunil Tatkare on Maharashtra New CM Government Formation : राज्यातील सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरे यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी सत्तास्थापनेच्या तारखेवरही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

अमित शाहांसोबत आज रात्री बैठक...; शपथविधीबाबत राष्ट्रवादीच्या नेत्याने दिले संकेत
अमित शाह, नेते, भाजप
Follow us
| Updated on: Dec 03, 2024 | 11:42 AM

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस झाले आहेत. मात्र अद्यापपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी झालेला नाही. हा शपथविधी कधी होणार? यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच अमित शाह यांच्यासोबत अजित पवारांची बैठक होऊ शकते, असे संकेतही तटकरेंनी दिले आहेत. अमित शाह चंदिगडमध्ये आहेत. आम्ही रात्री सगळे राजकीय चर्चा करू शकतो. ते काय होतय ते आम्ही बोलू. संघटनाबाबत आमची रात्री सविस्तर चर्चा झाली. अमित शाह यांच्यासोबत काही चर्चा करू. येत्या 5 तारखेला शपथविधी आहे, असं सुनिल तटकरे म्हणालेत.

मंत्रिपदाबाबत तटकरे म्हणाले….

मंत्रिपदाबाबत आम्ही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा आकडा किती यावर चर्चा करू. लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या. धाराशिव जागा आमची इच्छा नसताना लढावी लागली. विधानसभेला अधिक जागा मिळाव्यात ही आमची भूमिका होती. मात्र त्यावेळी देखील कमी मिळाल्या. आमच्यात उत्तम समन्वय होता. बूथ लेव्हल्पर्यंत आमचा समन्वय होता. आम्हाला विधानसभेला चांगल यश मिळालं होतं, असं सुनिल तटकरे म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांना योग्य तो मानसन्मान दिला जातोय. युतीमध्ये सर्वांना सन्मान आहे. सन्मानपूर्वक वागवलं जातं आहे. अजितदादा पवार, अमित शाह यांच्या भेटीसाठी पूर्वनियोजित आलेले नाहीत. कोणाच्या सुपिक डोक्यातून हे वृत्त निघालेलं हे माहीत नाही… दादा वेटिंगवर आहेत हे चुकीचं आहे, असंही तटकरेंनी म्हटलं आहे.

केसरकरांच्या नाराजीवर तटकरेंची प्रतिक्रिया

महायुती सरकारचा शपथविधी हा मुंबईतील आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती आहे. या ठिकाणी जात चंद्रशेखर बावनकुळेंनी पाहणी केली. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली. महायुतीत तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जर आम्हाला सांगितलं असतं की पाहणी करायला चला तर आम्ही गेलो असतो, असं म्हणत केसरकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिलीय. केसरकर यांनी व्यक्त केलेली गोष्ट रास्त असू शकते. आज सगळे नेते एकत्र पाहणी करतील. आज आमच्याही पक्षाचे नेते धनंजय मुंडे, अनिल भाईदास पाटील पाहणीसाठी जातील. हसन मुश्रीफ मुंबईत असतील तर तेही जातील, असं सुनिल तटकरे म्हणालेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.