ओरिएन्टल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही : सुनिल तटकरे

रायगडमध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी मोठ्या रकमेची मागणी करत असल्याची नागरिकांची गंभीर तक्रार आहे (Sunil Tatkare warn Oriental insurance officer).

ओरिएन्टल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही : सुनिल तटकरे
Follow us
| Updated on: Jun 27, 2020 | 8:02 AM

रायगड : निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्या रायगड जिल्ह्यातील विमा धारकांना त्यांचा परतावा मिळण्यासाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी मोठ्या रकमेची मागणी करत असल्याची नागरिकांची गंभीर तक्रार आहे (Sunil Tatkare warn Oriental insurance officer). अनेक विमाधारक नुकसानग्रस्तांनी राष्ट्रवादीचे सरचटणीस खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन याबाबत त्यांना माहिती दिली. यानंतर सुनिल तटकरे यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलाय. तसेच विमा अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचा पण केला आहे.

सरकारी विमा कंपनी असलेल्या ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी विमाधारकांना नुकसान भरपाईसाठी वेठीस धरत आहेत. अनेक उदाहरणं सध्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव या नुकसानग्रस्त भागात पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येथील विमा धारकांमध्ये ओरिएन्टल कंपनीबाबत संताप व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी घराचे, दुकानाचे, गुरांचा गोठा, गोडाऊन, खासगी कार्यालय, बांधकाम, बाग, शेती आदींचे विमा काढून घेतले आहेत.

निसर्ग चक्रीवादळात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे नुकसानग्रस्तांनी विमा कंपनीकडे मदतीची म्हणजे परताव्याची मागणी केली. परंतु परतावा मिळण्याऐवजी विमा कंपनीचे अधिकारी परताव्याच्या प्रमाणात नुकसानग्रस्त विमा धारकांकडूनच मोठ्या रकमेची मागणी करत आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त भयभीत झाले आहेत. अनेकवेळा विमा कंपनीकडे तगादा लावूनही परतावा मिळत नाही. अधिकारी वेठीस धरु लागल्याने अखेर पॉलिसीधारकांनी सर्व पुराव्यासह खासदार तटकरे यांच्याकडे तक्रार केली.

यानंतर खासदार सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे तक्रार करुन ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची मागणी केली. आज अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार तटकरे यांनी ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला. तसेच मुजोर अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणण्याचा इशारा दिला.

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | दिवसभरात सर्वाधिक 5,024 नवे रुग्ण, आकडा 1 लाख 52 हजारांच्या पार

रेल्वे दुर्घटनेत दोन्ही पाय गमावले, रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह, पिंपरीतील तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक

Sunil Tatkare warn Oriental insurance officer

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.