मुंबई : बिल्कीस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात गुजरात सरकारने 11 आरोपींची मुक्तता केली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बिवी नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारचा हा निर्णय रद्द केला. गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे धक्का दिला. शिक्षेत दिलेली सूट योग्य नाही. सन्मान हा महिलेचा अधिकार आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं.
आज शरद पवार यांनी या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. “7 लोकांची हत्या आणि एक भगिनीवर अत्याचार याची सगळी पार्श्वभूमी गोध्राची आहे. गोध्रामध्ये जे काही घडल त्यानंतर ज्या Reacion झाल्या होत्या. त्यापैकी ही घटना आहे” असं शरद पवार म्हणाले. “उशिर लागला. पण निदान सुप्रीम कोर्टाने जे गुन्हेगार सहभाही आहेत, त्यांच्याबद्दल सक्त भूमिका घेतली. आणि या प्रकरणात स्त्री वर्गाला, सामान्य माणसाला आधार देण्याच काम सुप्रीम कोर्टाच्या निकालाने झालं” असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार यांना महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा?
“गुन्हेगारांना शिक्षा माफ करण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतलेला. सुप्रीम कोर्टाने सांगितल की, हा निकाल महाराष्ट्र सरकारने द्यावा. आपण अपेक्षा करु की, महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यानंतर त्यांनी जी भूमिका मांडली, त्याची गंभीर्याने दखल घेईल. त्या भगिनीला न्याय देण्यासाठी कुठलाही राजकीय अभिनिवेश मध्ये न आणता महाराष्ट्र सरकार त्या संबंधीचा निकाल देईल अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र सरकारने या केसच गांभीर्य लक्षात घेऊन, अत्याचार करणारी प्रवृत्ती आहे, त्यांना समाजात संदेश जाईल अशी भूमिका घेतली पाहिजे” असं शरद पवार म्हणाले.