मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी काल पूर्ण झाली आहे. आता नबाम रेबिया विरुद्ध विधानसभा उपाध्यक्ष (2016) प्रकरणाचा फेरविचार करण्यासाठी हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे म्हणजे लार्जर बेंचकडे पाठवायचं की नाही? यावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कोर्टाच्या आजच्या निकालावर शिंदे आणि ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा फैसला होणार आहे. त्यामुळे आजचा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून या निकालाची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
मंगळवारी आठ याचिकांवर एकत्रित सुनावणी होण्याची शक्यता
पाच सदस्यीय खंडपीठाकडेच हे प्रकरण राहण्याची शक्यता
पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोरच पुन्हा सुनावणी होणार
पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ असल्यास निकाल महाराष्ट्रपुरताच राहणार- उल्हास बापट
१५ मे पर्यंत निकाल लागण्याची शक्यता- उल्हास बापट
नबाम रेबिया प्रकरणासह इतर मुद्यांवर पुन्हा युक्तीवादाची गरज- न्यायालय
२१ फेब्रवारी रोजी १०.३० वाजता युक्तीवाद होणार
मंगळवारी सात सदस्यीय खंडपीठाकडे देण्याचा निर्णय होणार
विधानसभा अध्यक्षांवर आणलेला प्रस्ताव योग्य की अयोग्य यावर चर्चा होणार
नबाम रेबियासह इतर मुद्देही तपासले जाणार
दोन्ही बाजूंच्या युक्तीवादाचे वाचन सुरु
सत्तासंघर्ष प्रकरणात आणखी युक्तीवादाची गरज
मंगळवारी पुन्हा युक्तीवाद होणार
आता मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार
गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली सुनावणी संपली
आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार
सत्तासंघर्षाचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाणार का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष