अजितदादांच्या विधानावरून सुप्रिया सुळे उद्विग्न?; म्हणाल्या, बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल…

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई होत असल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे. स्वत: अजित पवार यांनी पत्नीला निवडून आणण्यासाठी निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर घेतली आहे. तर मुलीला विजयी करण्यासाठी शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. दोन्ही नेत्यांच्या सभांना, रॅलीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दोन्ही गटाने आरोपप्रत्योराप करत वातावरण ढवळून काढलं आहे.

अजितदादांच्या विधानावरून सुप्रिया सुळे उद्विग्न?; म्हणाल्या, बहिणीचं प्रेम कमी पडलं असेल...
अजितदादांच्या विधानावरून सुप्रिया सुळे उद्विग्न ?
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 11:57 AM

बारामतीच्या रणमैदानात आता पवार कुटुंबातच आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी जंगजंग पछाडलं आहे. बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर माझं काही खरं नाही. त्यामुळे माझ्या पत्नीला निवडून द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उद्विग्न उद्गार काढले आहे. बहिणीचं प्रेम कुठे तरी कमी पडलं असेल. दुर्देवाने सर्वच नात्यात अडकले आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना अजितदादांना चांगलेच चिमटे काढले. कदाचित बहिणीच प्रेम कमी पडल असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती हे पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही. तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे. दादा असं बोलतात याचा मला आश्चर्य वाटतं, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

ते हे दादा नाहीत

घटस्फोट होऊन सात महिने झाले. अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केलं. दादा पालकमंत्री होते. मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते. तरीही दादा आता बोलतात याचं आश्चर्य आहे. दादांची एक खासियत होती. ती म्हणजे विरोधी पक्षाचे काम करणारा एक कणखर नेता म्हणून दादांकडे राज्य बघत होतं. पण आता ही भाषण जी कानावर येतात ती खूप आश्चर्यकारक आहेत. मला माहितीये हे अजितदादा नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.

शांततेत मतदान व्हावं

पारदर्शक आणि लोकशाही पद्धतीने शांततेच्या मार्गाने मतदान व्हावं. बारामती लोकसभा मतदारसंघात आज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आणि मी त्या कामासाठी लागली आहे. लोकांनी विचार, काम आणि मेरिट बघून मतदान करावं असं माझं मत आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज ठाकरे येणार… सर्वांचं स्वागत होईल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बारामतीत सभा घेणार आहेत. पहिल्यांदाच अजितदादा आणि राज ठाकरे एका मंचावर येणार आहेत. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अतिथी देवो भव. सगळ्यांचं स्वागत होईल आपल्या मतदारसंघात. प्रत्येकाचे स्वागत तुतारी वाजवणारा माणूसच करेल, असं त्यांनी सांगितलं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.