सुप्रिया सुळे भिडल्या, ‘काश्मीर ते कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है ncp म्हणजे…’

अजितदादा गटाचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादीमधील ८० टक्के पदाधिकारी हे अजित दादा यांच्यासोबत असल्याचा दावा केलाय. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षांचे नाव आम्हालाच मिळणारा असा दावा त्यांनी केलाय. यावरून सुप्रिया सुळे यांनी बोचरी टीका केलीय.

सुप्रिया सुळे भिडल्या, 'काश्मीर ते कन्याकुमारी बच्चा बच्चा जानता है ncp म्हणजे...'
SHARAD PAWAR, AJIT PAWAR, SUPRIYA SULE, PRAFULL PATEL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 01, 2023 | 7:53 PM

नागपूर : 1 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूर, वर्धा आणि अमरावती असा त्यांचा दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे प्रश्न समजून घेऊन लढण्याचा प्रयत्न करत असतो. त्या माध्यमातून लोकांशी 365 दिवस संवाद साधत असतो. बरेच दिवस या भागात येणं झालं नाही म्हणून विदर्भाचा दौरा करत आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आमची लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे लोकांना भेटण्याची ती आम्ही पार पाडतो असे त्या म्हणाल्या.

कांद्याची एवढी मोठी मीटिंग झाली. त्यामध्ये किती मंत्री गेले? एवढा मोठा कांद्याचा विषय असताना शेतकरी संकटात असताना यांचे चुकीचे धोरण कारणीभूत आहे. कांद्याचा प्रश्न गंभीर आहे हे मी चार महिने आधी ट्विट करून पियुष गोयल यांना सांगितलं होतं. जगात कांदा कमी आहे तिकडे जाऊ द्या असे सांगितलं होतं. शेतकऱ्यांना चार पैसे मिळत होते ते ही यांना चांगलं दिसलं नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

इंडिया टू च्या मार्चचे स्वागत

हे सरकार असंवेदनशील आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप जर कोणी करत असेल तर हे सरकार करत आहे. शेतकऱ्यांसाठी यांना वेळ नाही पण पक्ष फोड, नेते फोड यांच्यात त्यांचा वेळ जातोय. देशामध्ये इतका अन्याय होतो आहे त्यावर कोणीतरी बोललं पाहिजे. त्यासाठी इंडिया टू चा मार्च होत आहे याचे मी स्वागत करते, असे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्र आणि देशासमोर महागाई बेरोजगारी ही मोठी आव्हाने आहेत एलपीजीचे भाव वाढले आहे. पावसामुळे प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे हे सगळे प्रश्न असताना इतिहासकार ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे जे तज्ञ आहे त्यांनी वाघ नखे संदर्भात आपले विचार व्यक्त करायला पाहिजे असे त्या म्हणाल्या.

दिल्लीचा अदृश्य हात असावा

सुरज चव्हाण हे इलेक्शन कमिशनचे अध्यक्ष आहेत का? त्यांच्याबद्दल माझ्या ऐकण्यातही नाही आणि वाचण्यातही काही आलं नाही. मात्र, मला थोडा संशय यायला लागला आहे. प्रफुल पटेल तारीख सांगतात त्यांना तारीख कुठून मिळत आहे. यामागे तो दिल्लीचा अदृश्य हात असावा. अदृश्य हात सगळं चालवत आहे. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हे कळत नाही अशी टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट नाही. शरद पवार यांनी २५ वर्षांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सगळ्यांना माहित आहे. पार्टी शरद पवार यांनी बनवली आहे तर मग चिन्ह इकडे तिकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. देशात ‘काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बच्चा बच्चा जानता है की ncp म्हणजे शरद पवार.’ असे प्रत्युत्तर त्यांनी अजितदादा गटाला दिले.

अमरावतीला कोण उमेदवार?

अमरावतीमध्ये लोकसभा निवडणूक कोण लढविणार याचा निर्णय महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठकीत ठरेल. आमची रणनीती तयार आहे. पण, तुम्हाला कशी सांगणार? चर्चा झाल्यावर अमरावतीला कोण उमेदवार असणार हे सांगू. भाजपच्या विरोधात बोललं की त्याला आईस केला जातो. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, ई डी, सी बी आय आणि यात काही नवल नाही असेही त्यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.