अजितदादांनी शरद पवार यांचं वय काढलं?; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ठीक आहे, दादांसाठी…

राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर दिलं आहे. अजित पवार यांनी शरद पवार यांना वयाच्या मुद्द्यावरून डिवचले होते. पवार यांनी आराम करावा, निवृत्ती घेऊन आम्हाला सल्ला द्यावा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना टोले लगावले आहेत. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.

अजितदादांनी शरद पवार यांचं वय काढलं?; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ठीक आहे, दादांसाठी...
sharad pawar, ajit pawar and supriya pawar Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jan 08, 2024 | 5:46 PM

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 8 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा टीका केली होती. अजितदादा यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांचं वय काढलं. 80 वर्ष झाले… 84 वर्ष झाले तरीही निवृत्त होईना… करावं काय? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. अजितदादा यांच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ठीक आहे. ही लोकशाही आहे. कूल. 84 वय असूनही ते इतकं काम करत आहेत. दादासाठी अडचण कशाला? त्यांचा करिअर ग्राफ बघा, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे या मीडियाशी संवाद साधत होत्या. माझं सगळं आयुष्य सोशल मीडियावर आहे. मी देखील 16 तास काम करते. तुम्हाला माहितीच आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच रोहित पवार यांच्यावर अजितदादा यांनी केलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं. दादा आता सीनिअर सिटिझन आहे. दादापेक्षा रोहित छोटा आहे. रोहितच्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री होते, असंही त्या म्हणाल्या.

माझ्यावर चव्हाणांचे संस्कार

तुम्ही सारखी अजितदादांची बाजू का घेता? असा सवाल त्यांना यावेळी करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कृतीत वाढलेली मुलगी आहे. मी कधीच आरे कारे करत नाही. माझ्यावर हा संस्कार नाही. भाजपवाले मला म्हणतात की, किती चांगला बोलता, असं त्यांनी सांगितलं.

कायद्याचे ज्ञान वाढले

शिवसेनेच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य अवलंबून नाही. हा निर्णय आल्यावर बघू. राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी कधीही तयार असतो. सहा महिन्यात आमचे जरा कायद्याचे ज्ञान वाढले आहे, असंही त्या म्हणाल्या.

दहा दिवसात जागा वाटप जाहीर होणार

मुंबईतील दक्षिण आणि ईशान्य लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत वाद आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवार गटातील दक्षिण आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरून वाद मिटवला जाईल. त्याची फार चिंता वाटत नाही, शरद पवार तिढा सोडवतील. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला येत्या 8 ते 10 दिवसात अधिकृत जाहीर केला जाणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

आंबेडकर त्यात दिसतील

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत आले तर मनापासून आनंद होईल. त्यांना संसदेत पाहायला मला आवडेल. लवकरच इंडिया आघाडीचा फॉर्म्युला जाहीर केला जाईल. त्यात आंबेडकर दिसतील याचा मला विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.