कार्यक्रमाला गैरहजर तर बहिणींचे अर्ज रद्द ? त्या मेसेजनंतर सुप्रिया सुळे भडकल्या

'सत्तेत बसलेल्या भावांनो, 'बहिण-भावाचं' नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर ती नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा ' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे.

कार्यक्रमाला गैरहजर तर बहिणींचे अर्ज रद्द ? त्या मेसेजनंतर सुप्रिया सुळे भडकल्या
Follow us
| Updated on: Aug 17, 2024 | 11:58 AM

‘सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर ती नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा ‘ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. बालेवाडीतील कार्यक्रमाआधी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत आरोप केला आहे. या ट्विटद्वारे त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरत खडेबोल सुनावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून काल मविआच्या निर्धार मेळाव्यातही त्यांनी सरकारवर टीका केली होती. आता बालेवाडीतील कार्यक्रमापूर्वी फिरणाऱ्या एका मेसेजेच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी सरकारला चांगलंच खडसावलं आहे.

व्हायरल झालेल्या त्या मेसेजमध्ये काय म्हटलंय ?

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदाकरणाच्या अनुषंगाने शनिवारी 17 ऑगस्ट 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी स्टेडिअम पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी ज्या महिलांनी हाँ फॉर्म भरला आहे व त्याचे approval मेसेज आला आहे. त्यांनी या कार्यक्रमाला हजर रहावे यासाठी पुणे महानगरपालिकने अहिल्याबाई होलकर बचत गट हॉल सुखसागर पोलीस चौकी येथून निघण्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे. तसेच अल्पोपहाराची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी 9.30 वाजता अहिल्यादेवी होळकर बचत गट हॉल पोलीस चौकी येथून बसची सोय केलेली आहे. या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे, सर्वांनी येणे आवश्यक आहे. ज्या महिला येणार नाहीत त्यांचा फॉर्म रद्द होईल’ असे या मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट काय ?

याच मुद्यावरून सुप्रिया सुळे संतापल्या असून त्यांनी सरकारला जाब विचारला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणवितात आहेत… बहिणीला कार्यक्रमाला बोलाविणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार… अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त नसतं. बहिणींना प्रेमानं काही मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच. ‘ असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

सरकराला फटकारलं

यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारला धारेवर धरलं होतं. महाविकास आघाडीच्या मेळाव्यात त्यांनी तडाखेबाज भाषण केलं. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणातून थेट सर्वांच्या काळजाला हात घालतानाच सरकारला चांगलंच फटकारलं. विशेष करून राज्य सरकारला लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. ‘ लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणींची आठवण झाली नाही. पण निवडणुकीत पराभव होताच त्यांना बहिणींची आठवण झाली आहे. त्यामुळेच लाडकी बहीण योजना आणली. हे सरकार म्हणतंय एक बहीण गेली तर काय झालं? दुसरी बहीण येईल. मला या भावांना सांगायचं, हे नातं 1500 रुपयाला विकाऊ नाही हो’, असं सुप्रिया सुळे यांनी अशा शब्दात सरकारला टोला लगावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.