Supriya Sule यांची नसरापूर, पिरंगुटमध्ये ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरची राज्य सरकारकडे मागणी

Supriya Sule यांची नसरापूर, पिरंगुटमध्ये ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा सेंटरची राज्य सरकारकडे मागणी

| Updated on: Mar 05, 2022 | 3:44 PM

सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील नसरापूर आणि मुळशीतील पिरंगुट येथे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर व्हावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यातील नसरापूर आणि मुळशीतील पिरंगुट येथे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर व्हावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे मागणीचे पत्र देऊन त्यांच्यासोबत याबाबत चर्चा केली. मागणीबाबत लवकरात लवकर सकारात्मक पावले उचलली जातील, असे राजेश टोपेंनी म्हटले आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतारे उपस्थित होते. यानिमित्ताने ग्रामीण भागातील रुग्णसेवा वाढविण्याच्या कामालाही गती मिळणार आहे. नसरापूर, पिरंगुट याठिकाणी ग्रामीण रुग्णालय तसेच ट्रामा सेंटर व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. याची दखल खासदार सुप्रिया सुळेंनी तर घेतली. आता याचसंबंधी आरोग्यमंत्र्यांनाही त्यांनी पत्राद्वारे केली आहे. त्याला आरोग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Published on: Mar 05, 2022 03:43 PM