प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळे यांच्या भावना काय?, ट्विट होतंय व्हायरल

वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद केले. त्यामुळे बारामतीमध्ये पवार. वि पवार ही लढत आणखीनच चुरशीची होईल असं दिसतंय.

प्रकाश आंबेडकर यांचा जाहीर पाठिंबा, सुप्रिया सुळे यांच्या भावना काय?, ट्विट होतंय व्हायरल
सुप्रिया सुळेंनी मानले प्रकाश आंबेडकर यांचे आभार
Follow us
| Updated on: Apr 03, 2024 | 10:42 AM

लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसा तयारीला अजून रंग चढतोय. अनेक पक्षांच्या उमेदवारी यादी जाहीर होत आहे. महाविकास आघाडीकडून वंचितच्या प्रकाश आंबेडकरांसाठी चर्चेची दारं अद्याप उघडी असतानाता, दुसरीकडे वचिंतकडून एकामागोमाग एक उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत. वंचित बहुजन आघाडीने पुण्यातून वसंत मोरेंच नाव जाहीर करत मोठी खेळी केली. तर संपूर्ण राज्याचं लक्ष ज्या बारामतीकडे लागलंय तेथे प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

वंचितने बारामतीमध्ये कोणताही उमेदवार न उतरवता सुप्रिया सुळ यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता बारामतीमधील लढत आणखीनच चुरशीची होणार आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांचीच वहिनी, सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या बारामतीमध्ये निवडणूक लढवणार आहेत. विजय शिवतारेंचं बंड शमल्याने अजित पवार यांना दिलासा मिळाल्याची चर्चा होती. पण आता बारामतीत पवार वि. पवार असा सामना रंगणार आहे. त्यामुळे बारामतीकर कोणाच्या पारड्यात मत टाकतात, कोणाला निवडून देतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. बारामती मतदार संघात आता चुरशीची लढत होणार हे नक्कीच.

सुप्रिया सुळेंनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार

दरम्यान वंचित बहुजन आघाडीने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करत प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानले. त्यांचं हे ट्विट सध्या बरंच व्हायरल झालं आहे. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते, असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं आहे.

सुप्रिया सुळे यांचं ट्विट त्यांच्या शब्दात जसंच्या तसं..

‘ बारामती लोकसभा मतदारसंघातून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीची उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने माझ्याविरुद्ध उमेदवार न देण्याची भूमिका घेत पाठिंबा जाहिर केला आहे. याबद्दल मी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा. प्रकाशजी आंबेडकर यांचे मनापासून आभार मानते. आपण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिलात ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे. संविधानाच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी आपण सदैव एकत्रित काम करु ही ग्वाही देते. पुन्हा एकदा धन्यवाद’ असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

वंचितचे आणखी ५ उमेदवार जाहीर

वंचित बहुजन आघाडीकडून याआधी 19 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर काल वंचितकडून आणखी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. वंचितच्या आजच्या यादीत पुण्यातून वसंत मोरे, नांदेमधून अविनाश बोसीकर, परभणीतून बाबासाहेब उगले आणि शिरुर मतदारसंघातून मंगलदास बागूल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजीनगरमधून अफसार खान यांचे नाव जाहीर करण्यात आले. वंचितने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रात बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा जाहीर केला.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.