संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आका कोण? वकिलाच्या दाव्यानंतर आता सुरेश धस यांनीही घेतलं थेट नाव

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात सुरुवातीपासूनच सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यानंतर त्यांनी आता मोठा दावा केला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आका कोण? वकिलाच्या दाव्यानंतर आता सुरेश धस यांनीही घेतलं थेट नाव
Follow us
| Updated on: Jan 04, 2025 | 7:36 PM

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान आज या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. सुदर्शन घुले आणि  सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे, तर आरोपींना मदत करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबईतून अटक करण्यात आली. त्यानंतर या सर्व आरोपींना केज न्यायालयात हजर करण्यात आलं, न्यायालयानं आरोपींना 18 जानेवारीपर्यंत म्हणजे 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान युक्तिवाद सुरू असताना आरोपींच्या वकिलाकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून सातत्यानं या प्रकरणावर बोलताना आकाच्या नावाचा उल्लेख करण्यात येतो, मात्र या प्रकरणातील आका कोण हे अजूनही समोर आलेलं नव्हतं, मात्र न्यायालयात यावर बोलताना आरोपीच्या वकिलाकडून खळबळजनक दावा करण्यात आला, आका- आका म्हटलं जातय तो आका म्हणजे विष्णू चाटे हाच आहे, तो आधीपासूनच कोठडीत आहे, असा दावा आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला.

यावर आता सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे,  आरोपीचा वकील काहीही सांगेल, आरोपीच्या वकिलांनी कोर्टामध्ये जो युक्तिवाद केला त्याचं उत्तर मी का देऊ?  मी जो उल्लेख केलेला आका आहे, तो सगळ्या दुनियेनं ओळखला आहे, वाल्मिक अण्णा कराड हाच आका आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.  शंभर टक्के आरोपींना मोका लागणार आहे, राज्याचे मुख्यमंत्री यांनी मोका लावण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे यामध्ये सीआयडीने नवीन काही सांगण्याची आवश्यकता नाही असंही सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत संतोष देशमुखांच्या हत्येचं मळप जनतेच्या मनावरती आहे, तोपर्यंत सगळ्या लोकांमध्ये असंतोष राहणार.  मी म्हणतोय का धनंजय मुंडे यांनी हे कृत्य केलेय?  मात्र लोकांची सुई मात्र त्यांच्या बाजूने जाते.  या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका, त्याच्या ऐवजी प्रकाश दादांना मंत्री करा असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.