…तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. 

...तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
Follow us
| Updated on: Jan 14, 2025 | 9:12 PM

आज अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, या प्रकरणात सुरुवातीपासूनच आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.  वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे.  मकोका लावला आहे, 302 मध्ये देखील आरोपी झाले आहेत. खंडणीमध्येही आहेत, आता ते उद्या रितसर आत जातील असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

मी भविष्य किंवा ज्योतिषी नाही मात्र त्या परिसरात विचारलं तर काय काय घटना घडली त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. मी अगोदर त्याबाबत सांगितलं होतं तो पोलिसांनी संबंधित कंपनीकडून प्राप्त करून घेतला असेल. पुढे कायदेशीर कारवाई होईल. माझ्याकडे पुरावे असायला मी काही जेम्स बाँड नाही, पुरावे पोलीस गोळा करत आहेत, महाराष्ट्राचे पोलीस सीआयडी हे जेम्स बाँड पेक्षाही प्रभावी आहेत.

दरम्यान कराड कुटुंबाकडून सुरेश धस यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांना देखील सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. ते माझ्यावरती काही आरोप लावू शकत नाहीत त्यांना संविधानानं आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. या पुढे जर कोणी कोणाची हत्या केली तर त्याच्या बाजुनं आंदोलन करण्याची नवीन प्रथा महाराष्ट्रात पडेल असा टोलाही यावेळी सुरेश धस यांनी लगावला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी अडकवायचा काय संबंध.  पोलिसांना कडी लागल्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेणारच, सगळं काही सापडले असेल पोलिसांना, कोणी धमकी दिली कोणी उचलून आणायचं सांगितलं? कोणी मारायचा सांगितलं? या सर्व गोष्टीचे आका हे वाल्मीक कराडच आहेत हे सिद्ध झालं आहे. माझा लढा राष्ट्रपतींकडे माफी नामा पाठवला तरी चालूच राहील. या मधील सर्वांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी हा सुरेश धस प्रयत्न करेल असं या प्रकरणावर बोलताना सुरेश धस यांनी म्हटलं आहे.  दरम्यान दुसरीकडे वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर परळीमधील आंदोलन देखील चांगलंच पेटलं आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...