पवारसाहेबांनी खूप मानसन्मान दिला, त्यांना सोडायला नव्हतं पाहिजे…; कुणाकडून खंत व्यक्त?

Suryakanta Patil on Sharad Pawar : भाजपच्या महिला नेत्याने महत्वाचं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीवर बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर भाष्य केलंय. शरद पवार यांना सोडायला नको होतं, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली आहे. नांदेडमध्ये टीव्ही 9 मराठीशी त्या बोलत होत्या. वाचा सविस्तर...

पवारसाहेबांनी खूप मानसन्मान दिला, त्यांना सोडायला नव्हतं पाहिजे...; कुणाकडून खंत व्यक्त?
शरद पवारImage Credit source: FB
Follow us
| Updated on: Jun 08, 2024 | 5:31 PM

शरद पवारसाहेबांच्या बाबतीत माझा खूप राग होता. तो मी अनेकदा व्यक्त केला. शरद पवारांना सोडण्याची खंत माझ्या मनात जरूर आहे. रागात असताना मी विचार करायला पाहिजे होतं. पण तेव्हा मला माझ्यावर झालेला अन्याय मोठा वाटला. कदाचित माझी बुद्धी कमी असेल किंवा अनुभव कमी पडला असेल. मी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं भाजप नेत्या, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी म्हटलं. नांदेडमध्ये त्या टीव्ही 9 मराठीशी बोलत होत्या. तेव्हा त्यांनी खंत बोलून दाखवली.

शरद पवारांबाबत काय म्हणाल्या?

महाराष्ट्रात शरद पवारांची किमया पाहायला मिळते. पवारसाहेबांनी मला खूप मानसन्मान दिला. शरद पवारांची काय ताकद आहे आम्हाला माहित आहे. पवारसाहेबांनी जेव्हा अजितच्या युद्धाला तोंड द्यायचे ठरवलं. त्या दिवशीच वाटलं महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाचं वजन आता कमी होईल. शरद पवार म्हातारा झाल्यामुळे ज्या लोकांनी कमी आखलं, त्यांचं आकलन चुकीचं होतं. शरद पवार हे लहान आणि मोठा कधीच नसतात… शरद पवार हे शरद पवार आहेत, असंही सूर्यकांता पाटील म्हणाल्या.

सूर्यकांता पाटील कोण आहेत?

शरद पवार यांना सोडल्याची खंत व्यक्त करणाऱ्या सूर्यकांता पाटील या कोण आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर सूर्यकांता पाटील या सध्या भाजपच्या नेत्या आहेत. याआधी त्या राष्ट्रवादी पक्षात होत्या. हिंगोली नांदेड मतदारसंघांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. 2014 ला त्यांनी डॉ. माधवराव किन्हाळकर यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी शरद पवार यांच्याबाबत महत्वाचं विधान केलंय.

काही निर्णय चुकल्यामुळे आम्हाला हिंगोली, यवतमाळची सीट गमवावी लागली. मी शरद पवारांना सोडायला नव्हतं पाहिजे. त्यांना सोडल्याची मला खंत वाटते. शरद पवार लहान किंवा मोठा नसतो, शरद पवार हा शरद पवार असतो…, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या. भाजपात आल्याने अशोकराव चव्हाण यांचे वैयक्तिक नुकसान झालं आहे, असंही त्या म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.