गिरीश बापट प्रचारात दिसणं म्हणजे…सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल, अंधारे यांच्याकडून कुणावर टीकेचे बाण ?

कसबा पोटनिवडणुकीत धनेकरांचा विजय निश्चित आहे, त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, एकट्या कसबा निवडणुकीसाठी देवेंद्रजींनी अर्ध मंत्री मंडळ उतरवलय म्हणत अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

गिरीश बापट प्रचारात दिसणं म्हणजे...सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल, अंधारे यांच्याकडून कुणावर टीकेचे बाण ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 2:03 PM

पुणे : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेSushma Andhare )  यांनी कसबा निवडणुकीवरुण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासहित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devenedra Fadanvis ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुषमा अंधारे यांनी यावेळी कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांचा विजय निश्चित असल्याचा दावा करत भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची कोपरखळी लागावली आहे. एकट्या कसबा मतदार संघात अर्धे मंत्रिमंडळ उतरले होते म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधत मुख्यमंत्र्यांना गल्लोगल्ली फिरवले असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीये. पुण्यातील कसबा पेठ निवडणुकीवरुन सुषमा अंधारे यांनी जोरदार टीका केली आहे.

कसबा पोटनिवडणुकीत धनेकरांचा विजय निश्चित आहे, त्यामुळे भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, एकट्या कसबा निवडणुकीसाठी देवेंद्रजींनी अर्ध मंत्री मंडळ उतरवलय म्हणत अंधारे यांनी हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तर त्यांनी गल्ली गल्ली फिरवले, खरंतर मुख्यमंत्र्यांना असं गल्लोगल्ली फिरवणं अवमूल्य आहे, एवढं सगळं करूनही त्यांना अस्वस्थता असल्यामुळे बापट साहेबांना त्यांनी प्रचारात उतरवलं असं म्हणत भाजपाला चिमटा काढला आहे.

. बापट साहेबांना निवडणुकीत उतरवणे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना पराभव दिसून येत आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस पैशाचा पूर आणू शकतात आणि ते आणत आहेत असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

कसबा निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रचार केला आहे.

भाजपकडून महाविकास आघाडीवर हल्लाबोल करत कसबा मतदार संघात हेमंत रासने यांचा प्रचार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो केला होता.

भाजपच्या याच प्रचारवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी भाजपचा पराभव निश्चित असल्याचा दावा केला आहे. यावेळी त्यांनी गिरीश बापट यांना प्रचाराला आणावे लागत आहे यावरून टीका केली आहे.

भाजपचे खासदार गिरीश बापट यांना आजारी असतांना व्हीलचेअरवरुन प्रचार बैठकीत आणण्यात आले होते. त्यावरुन संपूर्ण राज्यात गिरीश बापट यांच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.