बाप वळण लावणारा असेल तर मुलांना वळण लागते, सुषमा अंधारे यांनी ‘त्यांचा’ थेट बापच काढला…
नारायण राणे यांची बारकी लेकरे दहशतवाद माजवत गेली, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांची हत्या कोणी केली? हे वेगळं सांगायची गरज नाही असा जोरदार टोलाही त्यांना सिंधुदुर्गात लगावला.
सिंधुदुर्गः ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत महाप्रबोधन यात्रेत शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी भाईयो ओर बहनो म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी बॅरिस्टर नाथ पै यांच्या नावाने ओळखला जाणारा हा जिल्हा आता दहशतवादी जिल्हा कसा झाला असा सवाल करत त्यांनी नारायण राणे यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर निशाणा साधला. महाप्रबोधन यात्रेत बोलताना त्यांना नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्रांवरही जोरदार हल्लाबोल चढविला.
नारायण राणे यांची बारकी लेकरे दहशतवाद माजवत गेली, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांची हत्या कोणी केली? हे वेगळं सांगायची गरज नाही असा जोरदार टोलाही त्यांना सिंधुदुर्गात लगावला.
राणे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांना बाप वळण लावणारा असेल तर मुलांना वळण लागते अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.
सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर आज जोरदार हल्ला केला. त्यांच्याच बालेकिल्ल्यात येऊन त्यांनी राणे यांच्यावर हल्ला चढविल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारण प्रचंड तापले होते. या महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारे यांनी व्हिडीओ लावून पुन्हा एकदा राणे कुटुंबीयांवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी त्यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना विधान परिषदेत कायदा सुव्यवस्थेवर भाषण करत होते. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले त्याचे व्हिडीओ स्क्रीनवर दाखवून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
सुषमा अंधारे यांनी आज कोकणचा दौरा करतान त्यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र धोक्यात आहे.
इथे कोणी प्रश्न विचारायला लागले की तिथून लक्ष विचलित करण्यासाठी अब्दूल सत्तार किंवा आणखी कोणाला तरी वेगळ्या विषयावर बोलायला लावायचे आणि मीडियाचे लक्ष तिकडे वळवायच असे उद्योग चालू असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बोलताना त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, सावरकर यांना भाजप भारतरत्न का देत नाही. असा सवाल करुन त्यांनी भारतीय जनता पार्टी फक्त चुना लावायचे काम करते आहे असा हल्लाबोलही त्यांनी चढविला.