‘देवेंद्र फडणवीस यांचा गजनी झालाय’, सुषमा अंधारे यांची टीका, का म्हणाल्या असं?

मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले भरत गोगावले 'पंचांग हरवलेलं आहे,' असं म्हणतात. त्यामुळे ते पंचांग जेव्हा सापडेल तेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही ते बघू, मुळात आता देवेंद्र फडणवीस यांचेच राज्यात काय खरं राहिलं नाही. मग बाकीच्यांचे काय सांगावे.

'देवेंद्र फडणवीस यांचा गजनी झालाय', सुषमा अंधारे यांची टीका, का म्हणाल्या असं?
DEVENDRA FADNAVIS, SUSHMA ANDHARE AND SACHIN AHIR Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 8:39 PM

सुनिल थिगळे, पुणे : 11 सप्टेंबर 2023 | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांसह पुण्यातील भीमाशंकर देवस्थानाचे दर्शन घेतलं. यावेळी दुष्काळातून राज्याची सुटका व्हावी. पक्षातील एकोपा कायम रहावा. उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाला आशीर्वाद द्यावा. राक्षसांचा विनाश करून प्रगतशील महाराष्ट्र घडविण्यांचं बळ द्यावं, अशी प्रार्थना केली. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्याचा होता. त्यामुळे आत्ताची मागणी केवळ मराठवाडा भागापुरती मर्यादित नाही. मराठा बांधव संघटित होऊन शांततेने आंदोलन करत आहे. पण, त्यांच्या सहनशीलतेला सुरुंग लावण्याचे काम सुरु राज्यसरकार करत आहे, अशी टीका उपनेते सचिन अहिर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली. तर, सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गजनी होऊ नये असा टोला लगावला.

राज्य सरकारमधील एक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना हा केंद्राचा विषय नाही, राज्याचा आहे हे आत्ता समजलं का? मग, हे निर्णय का घेत नाहीत? आमची सत्ता आली की पहिल्याच कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊ म्हणणारे आज अशी भाषा वापरत असतील तर दुर्दैव आहे, असे ते म्हणाले. आंदोलन चिरडण्याऐवजी आरक्षण देण्याचं काम या सरकारने तातडीनं करायला हवं, अशी मागणीही त्यांनी केली.

रेल्वेचे हेड ऑफिस, एअर इंडिया ऑफिस विकण्याचे काम झाले. अनेक कार्यालये आणि उद्योग गुजरातला हलविण्यात आले असे करत करत मुंबईचे महत्व कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जास्तीत जास्त शासकीय आणि केंद्रीय यंत्रणेवर मुंबईला अवलंबून ठेवायचे असे हे नियोजन दिसतंय, असे अहिर म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला. आजच्या दिवशी श्रावणातील शेवटच्या सोमवारची पूजा होती. आज मला वाटतं की, मनोज जरांगे पाटील यांची प्रार्थना ईश्वराने ऐकावी. त्यांना दीर्घायुष्य लाभावे. त्यांची प्रकृती ठणठणीत असावी. केवळ श्रेयवादाच्या लढाईत जाणीवपूर्वक हे केलं जातंय अशी टीका केली.

फडणवीस यांची उपकंत्राटे चालवणारी सदावर्ते

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नाहीत आणि एकनाथ शिंदे यांना हे श्रेय मिळू नये किंबहुना श्रेयवादाच्या राजकारणात आपली पोळी भाजण्याचे काम सुरु आहे. एकमेकांना चेकमेट करण्याचा हा प्रकार आहे मात्र यात सर्वसामान्यांची होरपळ होत आहे. मराठा आंदोलन पेटविण्याची भाषा आम्ही करत नाही. मी पेटवण्याऱ्यातील नाही. ते काम फडणवीस यांची उपकंत्राटे चालवणारी सदावर्ते सारख्यांचे आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीस यांचा गजनी होऊ नये.

नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्यांची जी भूमिका होती. ती त्यांना आठवावी. देवेंद्र फडणवीस यांचा गजनी होऊ नये. पहिल्याच कॅबिनेटमध्ये ते हा तिढा सोडवणार होते. आता किती कॅबिनेट उलटल्या, त्यामुळं आजच्या सर्व पक्षीय बैठकीत हा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अस्थिर आमदारांना ‘ती’ चिंता

आमच्यावेळी लढाई सुरू होती. तेव्हा विधिमंडळमधील आमदारांचा पक्ष असतो की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा असतो? यावर न्यायालयाने मूळ पक्ष बांधणी ज्यांनी केलं त्यांचे आहे असे म्हटले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही तेच घडतंय. त्यामुळे अस्थिर आमदारांना ‘ती’ चिंता लागलेली आहे, असे त्या म्हणाल्या.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.