मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली, महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करू, पण झालं काय…; या नेत्यानं सूडाच्या राजकारण समजून सांगितलं
राज्यातील राज्यकर्त्यांनी आधी या सगळ्या राजकारणातून बाहेर पडावं आणि राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे असा टोला शिंदे फडणवीस सरकारला त्यांनी लगावला आहे.
सांगली : काही महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांच्या सरकारला पायउतार केले होते. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सत्ताबद्दल करून महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आणले. महाविकास आघाडीचे सरकार गेल्या नंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावेळी महाराष्ट्राला आणि राज्यातील शेतकऱ्यांना अश्वासनांची खैरात केली होती. सरकार स्थापन होऊन काही महिने लोटले असले तरीही शेतकऱ्यांच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारने दुर्लक्ष केल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री पदावर विराजमान होतानाची आठवण करून देत शेतकऱ्यांसाठी त्यांनी दिलेल्या अश्वासनांची आठवणही त्यांनी करून दिली.
राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना शपथ घेताना जी अश्वासनं दिली होती.त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री यांनी शपथ घेतल्यानंतर हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करू असे अश्वासन दिले होते. मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत.
तर शिंदे-फडणवीस यांच्याच काळात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या काळात त्यांनी फक्त खोक्याच्या आणि एकमेकांचा बदला घ्यायच्याच गोष्टी केल्य आहे.
तसेच एकमेकांच्या कमरेखाली वार करायचे एवढचं काम या सरकारने केले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
त्यामुळे राज्यातील राज्यकर्त्यांनी आधी या सगळ्या राजकारणातून बाहेर पडावं आणि राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे असा टोला शिंदे फडणवीस सरकारला त्यांनी लगावला आहे.