Live Update : आजच्या महत्वाच्या बातम्या…

| Updated on: Nov 21, 2022 | 7:21 AM

आजच्या ताज्या बातम्या, एका क्लिकवर...

Live Update : आजच्या महत्वाच्या बातम्या...
Maharashtra Latest Breaking News Live UpdatesImage Credit source: tv9 marathi

मुंबई : आज रविवार, 20 नोव्हेंबर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. अशातच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यामुळे या मुद्द्यांवरून आज बऱ्याच घडामोडी घडण्याची शक्यता आहे. सगळ्या महत्वाच्या बातम्यांचे अपडेट वाचा एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Nov 2022 07:48 PM (IST)

    सुषमा अंधारे यांची औरंगाबाद शहरात सभा

    औरंगाबाद : सुषमा अंधारे यांची औरंगाबाद शहरात सभा, पैठण येथे संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ आणि अब्दुल सत्तार यांचा मतदारसंघ सिल्लोड विधानसभा येथील सभेनंतर आज शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विधानसभा मतदारसंघात होत आहे सुषमा अंधारे यांची सभा

  • 20 Nov 2022 07:47 PM (IST)

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी नाट्यमंदिरात दाखल

    प्रबोधनकार डॉट कॉम संकेतस्थळाचं लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी नाट्यमंदिरात दाखल वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही कार्यक्रमाला हजर राहणार

  • 20 Nov 2022 01:59 PM (IST)

    हिंदू धर्मीयांचा परभणीत हिंदू धर्मरक्षण मुकमोर्चा

    लव्ह जिहाद आणि धर्मपरिवर्तना विरोधात कायदा करण्याची मागणी

    मोठ्यासंख्येने हिंदू बांधवांचा मोर्चात सहभाग

    शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा

    जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन

  • 20 Nov 2022 12:56 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीसाठी सकाळी10 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात

    10 जागांसाठी 71 केंद्रांवर होणार मतदान, 10 जागांसाठी 37 उमेदवारांचे अर्ज आहेत

    पुणे, अहमदनगर आणि नाशिक व सिल्वासा येथे विद्यापीठातील 200 हून अधिक निवडणूक प्रतिनिधी, केंद्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली तसेच पोलिसांच्या सुरक्षेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे

    88 हजार 831 पदवीधर नोंदणी एकूण 71मतदान केंद्रावर मतदान होत आहे

    महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात समोरासमोर निवडणूक होत आहे

    दोन्ही गटाकडून सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असा दावा केला जातोय

    विद्यार्थी विकास मुद्दे त्याचे प्रश्न यावर निवडणूक लढवली जात आहे

  • 20 Nov 2022 12:14 PM (IST)

    नाशिकमध्ये शिवप्रेमींचं धोतर जाळून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात आंदोलन

    प्रतिकात्मक धोतर जाळून कोश्यारी यांच्या फोटोला मारले जोडे

    नाशिकच्या सातपूर परिसरात केलं शिवप्रेमींनी आंदोलन

    कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन

  • 20 Nov 2022 12:14 PM (IST)

    पुण्यात युवक काँग्रेसचे आंदोलन

    राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात पुण्यात काँग्रेस आक्रमक

    राज्यपालांनी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन

    पुण्यातील लाल महालासमोर युवक काँग्रेसच आंदोलन

  • 20 Nov 2022 12:11 PM (IST)

    औरंगाबादच्या क्रांती चौकात तीव्र आंदोलन सुरू

    राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या विरोधात शिवप्रेमी आक्रमक

    औरंगाबादच्या क्रांती चौकात तीव्र आंदोलन सुरू

    कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

    जोरदार घोषणाबाजी सुरू

    राज्यपालचा निषेध सुरू

  • 20 Nov 2022 12:05 PM (IST)

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राष्ट्रवादीकडून निषेध, सोलापुरात जोरदार आंदोलन

    छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालून राष्ट्रवादीकडून भगतसिंग कोश्यारींचा निषेध

    राज्यपाल हे सातत्याने राज्यातील सामाजिक शांतता भंग करण्याचे काम करत आहेत.

    त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचा निषेध करत आहे

    चले जाव, चले जाव भगतसिंग कोश्यारी चले जावच्या घोषणा देत केला राज्यपालांचा निषेध

  • 20 Nov 2022 11:20 AM (IST)

    म्हणून नाशिकच्या ‘त्या’ मद्यपी प्राध्यापकाकडून झाले एका मागून एक अपघात ..!

    पोलीस तपासात प्राध्यापकाचा धक्कादायक खुलासा

    ‘खोकला झाला की ब्रँडी प्यावी’ असं प्राध्यापकाने व्हॉट्सअॅपवर ऐकलं

    म्हणून ब्रँडीची अख्खी बाटलीच रिचवल्याची दिली कबुली

    त्यानंतर मद्यधुंद अवस्थेतच चालवली गाडी

    अपघातानंतर काहीच आठवत नसल्याचा प्राध्यापकाचा दावा

    पोलिसांनी प्राध्यापक साहेबराव निकमवर केला मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

    अपघातात 7-8 वाहनांचे नुकसान, तर दोघांची प्रकृती गंभीर

  • 20 Nov 2022 11:13 AM (IST)

    भंडारा जिल्ह्यात वाळूच्या कुत्रिम शॉर्टेज

    वैनगंगा नदिरूपी वाळूचे विस्तीर्ण पात्र लाभलेल्या भंडारा जिल्ह्यात वाळूच्या कुत्रिम शॉर्टेज

    वाळू घाट लीलाव न झाल्याने वाळू अभावी 400 कोटी रूपयांची बांधकामे थांबली

    कंत्राटदारांना नाहक विलंब दंड भोगावा लागत आहे

    कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात

  • 20 Nov 2022 10:10 AM (IST)

    राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये दाखल

    राहुल गांधींच्या स्वागतासाठी व त्यांच्या समस्या मांडण्यासाठी शेकडो कोळी बांधव मुंबईवरून आले

    पारंपरिक वेषभूषेत कोळी नृत्य करत केलं राहुल गांधींचं स्वागत

  • 20 Nov 2022 09:20 AM (IST)

    औरंगाबादेत राष्ट्रवादीमध्ये टोकाचा संघर्ष सुरू

    औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टोकाचा संघर्ष सुरू

    राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर गंभीर

    आमदार सतीश चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस संपवत असल्याचा केला आरोप

    राष्ट्रवादीतील नेत्यांना संपवण्यासाठी सतीश चव्हाण प्रयत्न करत असल्याचा आरोप

    तर आमदार सतीश चव्हाण यांनी फेटाळले भाऊसाहेब चिकटगावकर यांचे आरोप

    मी राष्ट्रवादी वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा खुलासा

    चिकटगावकर यांचे आरोप बिनबुडाचे आसल्याचं दिलं स्पष्टीकरण

  • 20 Nov 2022 08:59 AM (IST)

    चंद्रपूर शहरात अट्टल दुचाकी चोरट्याने थेट चोरलेली वाहने ओएलएक्सवर विकल्याचा प्रकार उजेडात

    चंद्रपूर शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी राबवली आहे दक्षता मोहीम

    याच दरम्यान एका मनोरंजन मेळ्यातून चोरीस गेलेल्या दुचाकीचा शोध सुरु असताना मिळाली माहिती

    चोरट्याकडून नागपुरातील इसमाने ओएलएक्सवर खरेदी केली दुचाकी

    नागरिकांनी मूळ कागदपत्रे व मालकाची खातरजमा करून दुचाकी खरेदी करण्याचे पोलिसांचे आवाहन

  • 20 Nov 2022 08:57 AM (IST)

    रत्नागिरीत मतलई वाऱ्यामुळे मासेमारीला ब्रेक

    या वाऱ्यामुळे मासेमारी जाळी टाकण्यासाठी येत आहेत अडसर

    गुरूवारपासून मतलई वाऱ्यांचा वेग वाढला

    गजबजलेल्या मिरकरवाडा, राजीवडा, भाट्ये, साखरतर, वरवडे, काळबादेवीसह अन्य बंदरात मासेमारी नौका किनाऱ्याला

    मच्छिमारी हंगाम सुरु होवून मच्छिमारांची जाळी रिकामी

  • 20 Nov 2022 08:55 AM (IST)

    उद्धव ठाकरे आढावा बैठक घेणार

    उद्धव ठाकरे यांचा येत्या बुधवारी पक्षाच्या मुंबईतील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद

    शिवसेना भवनात पार पडणार बैठक

    लोकसभा मतदार संघ निहाय घेणार पक्षाच्या परिस्थितीचा आढावा

  • 20 Nov 2022 08:39 AM (IST)

    आदिवासी शेतकरी भारत जोडो यात्रेत

    राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत नंदुरबार जिल्ह्यातील शेकडो आदिवासी शेतकरी सहभागी

    शेतजमिनी नावाने होत नसल्याची समस्या मांडण्यासाठी यात्रेत सहभागी

    आदिवासी वेशभूशेत आले आदिवासी शेतकरी

Published On - Nov 20,2022 8:33 AM

Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.