कार-बसची समोरासमोर धडक, अहमदनगरमध्ये भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू
ही धडक इतकी भीषण होती, की कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूवर धडकून तिचा अक्षरशः चुराडा झाला. (Car Luxury Bus Accident Ahmednagar)
अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर स्विफ्ट आणि लक्झरी बसची समोरासमोर धडक झाली. श्री क्षेत्र देवगड फाटा भागात हा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. (Swift Car Luxury Bus Accident kills five in Ahmednagar)
अहमदनगरकडून औरंगाबादकडे जात असलेल्या लक्झरी बसला रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास अपघात झाला. औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने जात असलेल्या स्विफ्ट कारची श्री क्षेत्र देवगड फाट्याजवळ बससोबत भीषण धडक झाली.
स्विफ्ट लक्झरीवर धडकून चक्काचूर
ही धडक इतकी भीषण होती, की कार ट्रॅव्हल्सच्या समोरील बाजूवर धडकून तिचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील पाच जणांना जागीच प्राण गमवावे लागले. मृत्युमुखी पडलेले सर्व जण जालना जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच अपघातग्रस्त मृत्युमुखी
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु केले. जखमींना ग्रामीण रुग्णालय, नेवासा फाटा येथे नेण्यात आले. परंतु पाचही जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. नेवासा पोलीस या प्रकरणी पुढील कार्यवाही करत आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गेल्या मंगळवारीच विचित्र अपघात झाला होता. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. टेम्पो, ट्रेलर, कारसह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला होता.
पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाट उतरताना फूड मॉलजवळ हा अपघात झाला होता. या अपघातातील दोन जखमींना अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलवण्यात आले होते. (Swift Car Luxury Bus Accident kills five in Ahmednagar)
कसा घडला होता अपघात?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचूर झाला होता.
या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमावरुन परतताना हा अपघात झाला. तर अन्य दोन कार सोबत होत्या. परंतु, घाटात मुंबईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या आणि या दोन कारचा अपघात झाला
संबंधित बातम्या :
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, आई-वडील-बहिणीचा मृत्यू, चिमुकला बचावला
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर क्वालिस कंटेनरला धडकली, तरुणाचा मृत्यू, चालक जखमी
(Swift Car Luxury Bus Accident kills five in Ahmednagar)