सिंधुदुर्गही म्हणणार ‘वाह ताज’! ताज हॉटेल्स ग्रुपसोबत ठाकरे सरकारचा करार
तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरु होणार आहे.
मुंबई : पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये जाण्याची उत्सुकता अनेकांना असते. देशातील विविध भागात असलेला ‘ताज हॉटेल्स ग्रुप’ आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. राज्य सरकारसोबत या संदर्भात सामंजस्य करार झाला. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी याविषयी माहिती दिली. (Taj Hotels Group signed an MoU with Government to run in Shiroda Sindhudurg)
“ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या दोन दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या तीन महिन्यांतच समस्यांचे निराकरण केले आणि आज या संदर्भात सामंजस्य करार झाला.” असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.
“तीन वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरु होणार आहे. ताज ग्रुपने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ हॉटेल स्थापित करण्यासाठी सुद्धा सामंजस्य करार केला. ही दोन्ही हॉटेल्स महाराष्ट्रात 125 कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक आणतील” असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : माजी महापौरांची मागणी मान्य करुन घेतली, आदित्य ठाकरेंचा मुंबईकरांना दिलासा
“संपूर्ण पर्यटन विभागासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. अनेक हॉटेल ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याने महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत आहे. यामुळे राज्यातील “मिशन बिगिन अगेन”ला सुद्धा चालना मिळणार आहे.” असे आदित्य ठाकरे म्हणाले.
Taj Hotels Group has officially come to Sindhudurg now. The district, meant to be a tourism hub, was awaiting this crown for 2 decades.
The MVA Govt resolved the issues in the first 3 months & today an MoU was signed. In 3 years’ time, a Taj Hotel will be running in Shiroda. pic.twitter.com/O1kqc07h0l
— Aaditya Thackeray (@AUThackeray) August 27, 2020
संबंधित बातम्या :
GST थकबाकी वाढत गेल्यास दोन वर्षात एक लाख कोटींवर, जीएसटी परिषदेत अजित पवारांकडून भीती व्यक्त
(Taj Hotels Group signed an MoU with Government to run in Shiroda Sindhudurg)