नाशिक : खवय्यांना आकर्षित करण्यासाठी कधी बक्षिसे तर वेगवेगळे खाद्यपदार्थांना वेगवेगळी (Tanduri Nikhara Tadka Misal) नावे देऊन आकर्षित केल्या जाते. मात्र, लासलगाव जवळील निफाड तालुक्यातील विंचूर येथे खास खवय्यांची मागणी पाहता तंदुरी चहानंतर आता ‘तंदुरी निखारा तडका मिसळ’ ती ही महाराष्ट्रात पहिल्यांदा मिळत आहे (Tanduri Nikhara Tadka Misal).
आजपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची मिसळ खाल्ली असेल परंतु चुलीवरील तंदुरी निखारा तडका मिसळ खाल्ली का? नाही ना तर मग विंचूर येथे एका महिलेने प्रथमच तंदुरी निखारा तडका मिसळ बनवण्यास सुरुवात केली आहे आणि ही मिसळ खाण्यासाठी खवय्यांची चांगलीच गर्दी होताना दिसते.
>> चुलीवर एका मातीच्या भांड्यात मिसळ शिजवून घेतली जाते
>> त्यानंतर कोळशाच्या तंदूर(भट्टी)मध्ये मातीची छोटी मडकी (बोळके) गरम करून त्या गरम बोळक्यात शिजवलेली मिसळ ओतून तडका दिला जातो
>> त्यामुळे त्याला एक मातीचा सुगंध येतो
>> त्यानंतर मातीच्या तवलीमध्ये गावठी तुपाची धुनी दिली जाते
>> त्यानंतर तयार झालेली तंदुरी निखारा तडका मिसळ मातीच्याच भांड्यात ग्राहकांना खाण्यासाठी दिली जाते
Tanduri Nikhara Tadka Misal
नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावरील विंचूर येथील विष्णुनगर येथील महिला सुनिता घायाळ यांच्याकडे थोडी शेती होती. त्या घरची शेती करुन इतरांच्या शेतात शेती काम करण्यासाठी जायच्या. त्यांचे पती शिवाजी यांनी दोन वर्षांपूर्वी साधी चहाची टपरी टाकून चहाचा व्यवसाय सुरु केला. एक वर्षापूर्वी पतीला मदत होईल या उद्देशाने सुनिता यांनी तंदुरी चहा सुरु केला. ग्राहकांची मागणी पाहता चुलीवरील मिसळही सुरु केली. युट्यूबच्या मदतीने चुलीवरील तंदुरी निखारा तडका मिसळ बनवण्याची रेसिपी समजून घेत बनवण्यास सुरुवात केली.
ही तंदुरी निखारा तडका मिसळ लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. शिर्डीला जाणारे गुजराती भाविक येता-जाता थांबत आवर्जून या मिसळचा आस्वाद घेत आहे. तसेच, नाशिक जिल्ह्यात प्रथमतः तंदुरी मिसळ मिळत असल्याने परिसरातील ग्राहक आणि महिला ही मिसळ बनवण्याची कला पाहण्यासाठी, तसेच त्याचा मनमुराद आस्वाद घेण्यासाठी गर्दी करत असल्याने या महिलेला यातून रोजगार उपलब्ध झाला आहे.
VIDEO | Pune | विराट ‘बुलेट थाळी’ एका तासात संपवा आणि बुलेट बाईक जिंका, अनोख्या ऑफरची पुण्यात चर्चा #Bullet #Bullet_thali #Pune pic.twitter.com/05pErMnEqA
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021
Tanduri Nikhara Tadka Misal
संबंधित बातम्या :
रामायण-महाभारतातही उल्लेख, धार्मिक पूजेतील मानाचे ‘पान’ कसे बनले ‘माऊथ फ्रेशनर’?
Winter Care | हिवाळ्यात ‘ही’ पेय ठेवतील शरीराला आतून उबदार, वाचा यांची वैशिष्ट्ये…
एका तासात थाळी संपवा, बुलेट जिंका, पुण्यातील हॉटेलची सुसाट ऑफर