कोरोना नियंत्रणासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स, अमित देशमुखांची घोषणा

कोरोना नियंत्रणासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे (Corona Task force for corona in every district).

कोरोना नियंत्रणासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स, अमित देशमुखांची घोषणा
Follow us
| Updated on: Jul 02, 2020 | 3:22 PM

मुंबई : कोविड – 19 म्हणजेच कोरोना विषाणू विरुद्धचा लढा अधिक प्रभावी करण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांची टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे (Corona Task force in every district). वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी याची माहिती दिली. या टास्कफोर्समध्ये डॉक्टर्स, या क्षेत्रातील तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपचार, उपाययोजनांसोबतच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवणे देखील महत्त्वाचं आहे. हा समन्वय आणि त्यांचे नियंत्रण करण्यासाठीच जिल्हास्तरावर ही टास्कफोर्स काम करेल. जिल्ह्याधिकाऱ्यांना अशा प्रकारचे टास्क फोर्स नेमण्याबाबत कळवण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दिले आहेत.

राज्यात सध्या साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात येत असलेल्या या नव्या टास्कफोर्सच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करता येईल, असंही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं.

दरम्यान, राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच आहे. काल (1 जुलै) दिवसभरात राज्यात 5537 रुग्णांची नोंद झाली आहे (Maharashtra Corona Updates). यासह राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 80 हजार 298 पर्यंत पोहचली आहे. दिवसभरात 2 हजार 243 कोरोना बाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आतापर्यंत एकूण 93 हजार 154 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात एकूण 79 हजार 075 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

दिवसभरात 198 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 69 मृत्यू मागील 48 तासांमधील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील 69, मीरा भाईंदर 26, ठाणे मनपा 17, कल्याण डोंबिवली 4, जळगाव 3, पुणे 3, नवी मुंबई 1, उल्हास नगर 1, भिवंडी 1, पालघर 1, वसई विरार 1, धुळे 1 आणि अकोला 1 यांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर सध्या 4.47 टक्के इतका आहे. कोरोनाशी लढा अयशस्वी ठरल्याने मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 8,053 वर पोहोचली आहे. राज्यातील एकूण 93 हजार 154 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 51.67 टक्के इतकं आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण 9 लाख 92 हजार 723 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 1 लाख 80 हजार 298 नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले. हे प्रमाण 18.16 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 6 लाख 08 हजार 660 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 38 हजार 396 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

हेही वाचा :

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार, ठरलेल्या दरापेक्षा लूटमार करणाऱ्यांवर गुन्हा : राजेश टोपे

चौथीची पोरगी सांगेल, यांचं काही खरं नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते : चंद्रकांत पाटील

सरकारच्या सूचना पाळून उत्सव साजरा करण्याची हीच ती वेळ, ‘लालबागचा राजा’च्या निर्णयावर शेलारांची नाराजी

Corona Task force in every district

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.