VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं

अशोक कळंबटे यांनी आपल्या नातवाला धरलं आणि त्याच्या अंगावर ते स्वतः झोपले. (Tauktae Cyclone Ratnagiri Grandfather )

VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं
कळंबटे आजोबा आणि नातू
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 1:01 PM

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) कोकण किनारपट्टीवर थैमान घातलं. या वादळामुळे रत्नागिरी जवळच्या कर्ला गावातील कळंबटे कुटुंबावर कठीण प्रसंग ओढावला होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावर तब्बल दोन भली मोठी झाडं कोसळली. परंतु आजोबांनी जीवाचा कोट करुन आपल्या पाच वर्षांच्या नातवाचे प्राण वाचवले. आजोबांच्या बहादुरीचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. (Tauktae Cyclone Ratnagiri Grandfather Saves Child as Tree falls on House)

आजोबा अशोक कळंबटे यांच्यासोबत त्यांचा पाच वर्षांचा नातू वेदांत कळंबटे देवघरात होता. यावेळी घरात अशोक यांची पत्नी सुगंधा, त्यांचा मुलगा भालचंद्र आणि सून रुणाली होत्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घरावर झाड कोसळण्याची भीती अशोक यांना वाटत होती. त्यामुळे आजोबा आधीपासून आपल्या कुटुंबीयांच्या आणि विशेषतः नातवाच्या सुरक्षिततेबाबत सावध होते.

झाडाखाली नातू अडकण्याची भीती

इतक्यात, झाड तुटल्याचा भलामोठा आवाज आला. समोरच नातू देवघरातून दुसऱ्या खोलीमध्ये जात होता. झाड पडत असल्याची कल्पना आलेल्या अशोक यांना आपला नातूही त्याच दिशेने जात असल्याचं लक्षात आलं. काही क्षणात अशोक यांनी आपल्या नातवाला धरलं आणि त्याच्या अंगावर ते स्वतः झोपले.

नातवाच्या अंगावर झोकून प्राण वाचवले

या नैसर्गिक आपत्तीत नातवाला काही होणार नाही याची खबरदारी घेत आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी चिमुकल्याचा जीव वाचवला. आपल्या नातवाच्या अंगावर स्वतः झोकून देत त्यांनी येणारे संकट स्वतःवर झेलले. यामध्ये आजोबा, आजी आणि नातू यांना किरकोळ दुखापत झाली आहे. (Tauktae Cyclone Ratnagiri Grandfather )

आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या नातवाला वाचवल्याचं वृत्त समजताच त्यांच्या साहसाचं कौतुक होत आहे. आजोबा आणि नातू या संकटातून बालंबाल बचावल्याने कुटुंबीयांचा जीवही भांड्यात पडला.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

कुठे घरांच्या छत कोसळल्या तर कुठे झाडे पडली; महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत दाणादाण

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि…

(Tauktae Cyclone Ratnagiri Grandfather Saves Child as Tree falls on House)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.