Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report : बॅनरमधल्या उंचीवरून टोले-टोमणे, मुख्यमंत्र्यांपेक्षा … यांचे बॅनर मोठं का?, विरोधकांचे चिमटे

नागपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरची उंची मुख्यमंत्र्यांच्या बॅनरपेक्षा मोठी असल्यानं विरोधकांनी चिमटे काढले.

Special Report : बॅनरमधल्या उंचीवरून टोले-टोमणे, मुख्यमंत्र्यांपेक्षा ... यांचे बॅनर मोठं का?, विरोधकांचे चिमटे
Follow us
| Updated on: Dec 29, 2022 | 11:54 PM

नागपूर : अधिवेशनादरम्यान नागपुरात लावलेल्या एका पोस्टरवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टोले लगावले आहेत. नागपुरात शिंदेपेक्षा फडणवीसांचं बॅनर मोठं लावल्यानं विरोधकांनी चांगलेच चिमटे काढले आहेत. अधिवेशनादरम्यान नागपूर विधानभवनाच्या बाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोस्टर लावण्यात आला होता. पण या पोस्टरमध्ये फडणवीसांची उंची ही शिंदेंपेक्षा जास्त होती. त्यामुळं या पोस्टरची अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा पसरली. कुजबूज झाल्यानंतर मात्र हे पोस्टर बदलण्यात आलं. इकडचा पोस्टर तिकडे..अन् तिकडचा पोस्टर इकडे करण्यात आला. शिंदेंच्या पोस्टरची उंचीही वाढवण्यात आली.

पोस्टर लावताना साधारणपणे वजनदार आणि पदानं मोठ्या असलेल्या नेत्याचा फोटो मोठा लावला जातो. पण नागपुरात उपमुख्यमंत्र्यांच्या बॅनरची उंची मुख्यमंत्र्यांच्या बॅनरपेक्षा मोठी असल्यानं विरोधकांनी चिमटे काढले.

भास्कर जाधव म्हणाले, भाजपची कृती आपल्या मित्राला कट टू साईड करण्याची असते. कालपर्यंत एकनाथ शिंदे छोटे होते आज मोठे झालेले दिसत आहेत. काल ते डाव्या बाजूला आले. आज देवेंद्र फडणवीस उजव्या बाजूला आले. त्यामुळे एकनाथराव यांनी भाजपपासून सांभाळून राहावं.

नाना पटोले म्हणाले, राज्यातलं हे सरकार असंविधानिक आहे. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे. संविधानिक सरकार त्यातले हे दोन जोडीदार त्यात कोण मोठा 50 आमदार चोरून नेणारा मोठा की 105 आमदार असलेला मोठा. मग उपमुख्यमंत्री माईक ओढतात. पूर्ण हसा महाराष्ट्रचा होतोय. बोम्बई आग ओकतोय त्यावर बोलत नाही. फक्त मुंबई कोणाच्या बापाची नाही, असं एवढंच त्वेषाने बोलणं जमत. दिल्लीच्या नेत्याच्या समोर शेपूट टाकून मी मोठा मी मोठं म्हटलं जातं.

देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचं सरकार चालवतात, अशी टीका ठाकरे गट नेहमी करतो. आधी फडणवीसांनी शिंदेंच्या समोरुन घेतलेल्या माईकवरुन ठाकरे गटानं शिंदेंना लक्ष्य केलं होतं. आता नागपुरातल्या या पोस्टरमुळं शिंदे-फडणवीसांवर टीका करण्याची आयती संधी ठाकरे गटाला मिळालीय.

टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान
दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याला भीषण आग; ऐतिहासिक वास्तुचं मोठं नुकसान.