मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द होणार? असं अचानक काय घडलं ? जाणून घ्या

जवळपास दोन ते तीन तास दुरुस्तीला वेळ लागणार असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा औरंगाबाद आणि पुणे दौरा रद्द होणार? असं अचानक काय घडलं ? जाणून घ्या
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 05, 2023 | 11:33 AM

गिरीश गायकवाड, टीव्ही 9 मराठी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना जवळपास अर्धा तास मुंबई विमानतळावर व्हीआयपी प्रतीक्षालयात थांबावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित औरंगाबाद दौरा होता. मात्र, विमानात तांत्रिक बिगाड झाल्याची माहिती देण्यात आल्याने शिंदे-फडणवीस यांचा औरंगाबाद दौरा जवळपास रद्द झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विमानतळावरुण ठाण्याच्या दिशेने रवाना झाले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्याच्या दिशेने आपल्या वाहनाने रवाना झाले आहे. एकूणच काय तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असलेला एकत्रित दौरा औरंगाबाद दौरा रद्द झाला असून विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका त्यांना बसला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बायरोड पुण्याच्या दिशेने रवाना झाला आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा फटका बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही औरंगाबाद दौरा रद्द करून ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहे, दुपारी ते पुण्याला जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

जवळपास दोन ते तीन तास दुरुस्तीला वेळ लागणार असल्याची माहिती मिळाल्याने शिंदे-फडणवीस यांनी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाय रोड पुण्याला जाणार असले तरी मुख्यमंत्री शिंदे पुण्याला जातात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.