Nanded : मराठवाड्यातल्या लोकांना कामधंदे नाहीत, थोरात, केंद्रेकरांच्या उपस्थितीत तहसिलदारांचं हसत हसत वादग्रस्त वक्तव्य

इथल्या तहसीलदारांनी हसत हसत जो टोला लगावला आहे, तो आता चर्चेत आहे. मराठवाड्यातील लोकांना काही काम धंदे नाहीत, त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. असे वादग्रस्त वक्तव्य नांदेडच्या तहसीलदारांनी (Kiran Ambekar) केलंय.

Nanded : मराठवाड्यातल्या लोकांना कामधंदे नाहीत, थोरात, केंद्रेकरांच्या उपस्थितीत तहसिलदारांचं हसत हसत वादग्रस्त वक्तव्य
मराठवाड्यातल्या लोकांना कामधंदे नाहीत, थोरात, केंद्रेकरांच्या उपस्थितीत तहसिलदारांचं हसत हसत वादग्रस्त वक्तव्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 5:18 PM

नांदेड : आज नांदेडमध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी त्यांच्यासमोर जे घडलं, त्यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे. यावेळी या कार्यक्रमात फक्त थोरातच नव्हते तर मराठवाड्याचे विभागीय आयुक्त गोविंद केंद्रेकरही (Govind Kendrakar) उपस्थित होते. यावेळी इथल्या तहसीलदारांनी हसत हसत जो टोला लगावला आहे, तो आता चर्चेत आहे. मराठवाड्यातील लोकांना काही काम धंदे नाहीत, त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. असे वादग्रस्त वक्तव्य नांदेडच्या तहसीलदारांनी (Kiran Ambekar) केलंय. विभागीय क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने महसूलमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधीच्या समक्ष तहसीलदाराने अश्याप्रकारे वक्तव्य केल्याने अनेकांना मोठा धक्का बसलाय. भ्रष्टाचाराच्या अभ्यासपूर्ण तक्रारी असतील तर त्यात गैर काय असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय.

तहसीलदार नेमकं काय म्हणाले?

हे वक्तव्य करणाऱ्या तहसील दारांचं नाव आहे. किरण आंबेकर. गेल्या अनेक वर्षांपासून नांदेडमध्येच कार्यरत असलेल्या तहसीलदार किरण आंबेकर यांचे भर सभेतील हे वादग्रस्त वक्तव्य चांगलच चर्चेत आलय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियात त्यांचा निषेध नोंदवला जातोय. या सभेत बोलता बोलता, हसत हसत आंबेकर म्हणाले. ” मराठवाड्यात विभागीय चौकशांचे प्रमाण फार जास्त आहे. असे म्हटल्यानंतर साहेबांनी मला विचारलं की हे कशामुळे जास्त आहे. तर मी सांगितलं मराठवाड्यात थोडी परिस्थिती बिकट आहे. लोकांना कामधंदे नाहीत. त्यामुळे अभ्यास करून तक्रारी करण्याची संख्या मराठवाड्यात फार वाढली आहे. त्यामुळे या तक्रारी होत आहेत. यात कोणत्याही पद्धतीचे आरोप केले जातात. तसेच यातले काही आरोप सत्यही असतात, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर जोरदार टीका

तसेच ” जास्त अभ्यास केल्यानंतर कुणाला दोषी पकडाचं असेल. आणि जबाबादार धरायचं असेल. मात्र विविध विभागाच्या जीआरमध्ये तहसिलदाराचे नाव हे शंभर टक्के टाकलं जातंय. आणि महसूल विभागावर त्याचा ताण पडतो आहे. याबाबत सर मी यापूर्वीही सांगितलं आहे. की आपल्या परवानगीशिवाय इतर विभागांनी हे जीआर काढू नये. असेही त्यांनी बाळासाहेब थोरातांना उद्देशून सांगितलं. त्यामुळे आता तहसिलदारांच्या या वक्तव्यावरून नवा वाद पेटला आहे. मराठवाड्यातील मंडळी आता या तहसीलदारांविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या तक्रारी मांडत असताना तहसीलदार साहेब हे मराठवाड्यातील लोकांना काम नसतं, म्हणून तक्रारी करता, असेच बोलून बसले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांना सध्या रोषाचा सामना करावा लागत आहे. आता या प्रकरणात पुढे काय ट्विस्ट येतं की हे प्रकरण इथेच संपतं? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.