कोरोनाबाधित असूनही कामांचा निपटारा, आयसोलेशन कालावधीमध्ये तेजस्वी सातपुतेंचं वर्क फ्रॉम होम जोमात सुरु
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते कोरोनातून मुक्त झाल्या असून त्यांनी पॉझिटिव्ह असताना कामांचा निपटारा सुरु ठेवला होता. Tejaswi Satpute work from home
सोलापूर: सोलापूर ग्रामीणच्या पोली अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनावर मात करुन काम्हाला पुन्हा सुरुवात केली आहे. तेजस्वी सातपुते यांनी कोरोनातून मुक्त झाल्यानंतर एक फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्या कामाला पुन्हा सुरुवात केलीय. तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छा, प्रार्थना यांमुोळे कोरोनातून मुक्त झाले असं म्हणत त्यांनी आभार मानले आहेत. आयसोलेशेन कालावधी पूर्ण झाल्यानंतर लवरकचं प्रत्यक्ष फिल्डवर काम सुरु होईल. सर्वांचे धन्यवाद, काळजी घ्या, असं आवाहन तेजस्वी सातपुते यांनी केलं आहे. तेजस्वी सातपुते यांनी कोरोना संसर्ग झालेला असताना देखील घरातूनचं फोन आणि व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर ग्रामीणच्या पोलीस यंत्रणेला सूचना देण्याचं काम सुरु ठेवलं होतं. (Tejaswi Satpute Solapur Rural superintendent of police cure from corona and started work from home during isolation period)
तेजस्वी सातपुते यांचं ट्विट
Back to work again…. With all your best wishes and prayers, recovered from covid…soon will be on field once isolation period is over. Thank you. Take care. pic.twitter.com/4aYlG7ZUBx
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) April 20, 2021
तेजस्वी सातपुते यांना 7 एप्रिलला कोरोना
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पतीला कोरोना संसर्ग झाल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली होती. तेजस्वी सातपुते यांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्या होम क्वारंटाईन झाल्या होत्या. दरम्यानच्या काळात ग्रामीण सोलापूरच्या कार्यकक्षेतील पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या पंढरपूर येथील कोविड सेंटरचा आढावा घेण्याचं काम सुरु ठेवलं होतं. सोलापूर ग्रामीणच्या कार्यकक्षेतील पोलीस आणि त्यांचे नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आल्यास त्यांना पंढरपूर येथे पोलीस कल्याण हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेलं आहे. त्याचाही आढावा तेजस्वी सातपुते यांनी घेतला. सातपुते यांनी 20 फेब्रुवारीला कोरोना लसीचा डोस घेतला होता.
तेजस्वी सातपुतेंचा ‘कोविड वूमन वॉरियर’पुरस्कारानं गौरव
कोरोना महासाथीच्या काळात आपले कर्तव्य उत्कृष्टपणे बजावल्यामुळे तेजस्वी सातपुते यांच्यासह महाराष्ट्रातील 4 महिला पोलीस अधिकाऱ्यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालेलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या 29 व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लीत हा सोहळा पार पडला होता. सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह, मुंबई पोलीस उपायुक्त नियती ठाकर-दवे यांना ‘कोविड वूमन वॉरियर’ पुरस्कार मिळाला होता.
Recognition of work done by Maharashtra police during COVID-19 tough times @NCW pic.twitter.com/PUV7UpIG1z
— Tejaswi Satpute (@TejaswiSatpute) February 1, 2021
कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाला तेव्हा तेजस्वी सातपुते सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. सातारा जिल्ह्यातही कोरोना विषाणू संसर्गाच्या कालावधीमध्ये तेजस्वी सातपुते यांनी चांगलं काम केले होते. सातारा आणि सोलापूर ग्रामीणमध्ये केलेल्या कामाची दखल म्हणून राष्ट्रीय महिला आयोगानं ‘कोविड वूमन वॉरियर’ हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला होता.
संबंधित बातम्या:
एक फोटो, 4 महिला पोलीस अधिकारी आणि एक लाजवाब कामगिरी
(Tejaswi Satpute Solapur Rural superintendent of police cure from corona and started work from home during isolation period)