महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक

तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक केले.

महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे तेलंगणाच्या कृषिमंत्र्यांकडून कौतुक
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 6:14 PM

मुंबई :  तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक केले. सह्याद्री अतिथीगृहावर रेड्डी यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेतली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, तेलंगणाच्या पणन संचालक श्रीमती लक्ष्मी यावेळी उपस्थित होते.  (Telangana Agriculture Minister S. niranjan reddy meet Dada Bhuse)

महाराष्ट्र फळबाग लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर असून त्या बाबतीत महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून या क्षेत्रात तेलंगणा राज्याच्या कृषी विभागाच्या अभिनव योजनांचा अभ्यास केला जाईल, असं महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं.

कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप असून महाराष्ट्र दौरा त्यासाठी लाभदायी ठरेल, असे कृषिमंत्री रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचे विशेष कौतुक त्यांनी यावेळी केले. तसंच त्यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरणादरम्यान महाराष्ट्रातील विविध कृषी योजनांची माहिती दिली.

(Telangana Agriculture Minister S. niranjan reddy meet Dada Bhuse)

संबंधित बातम्या

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपर्यंत आर्थिक मदत देऊ, दादा भुसे यांचे आश्वासन

उस्मानाबाद तालुक्यात फळबागांचे शून्य टक्के नुकसान, जिल्हा प्रशासनाचा अजब पंचनामा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.