अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होणार?, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठीचे पास निम्म्यावर; कोरोना संसर्गामुळे अलर्ट

कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीच्या पासची संख्या निम्याने करण्यात आली आहे. (authority tulajabhavani mata temple visit)

अंबाबाईच्या दर्शनाची वेळ कमी होणार?, आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठीचे पास निम्म्यावर; कोरोना संसर्गामुळे अलर्ट
माता अंबाबाई आणि तुळजाभवाईनी आई
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 7:14 PM

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठीच्या पासची संख्या निम्म्याने कमी करण्यात आली आहे. हा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यात विनामास्क फिरताना आढळल्यास 1 हजारांचा दंड घेण्याचा आदेश येथील जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तर दुसरीकडे कोल्हापुरातील करवीर निवसीनी अंबाबाई च्या दर्शनाची वेळही कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर आगामी दोन दिवसांत निर्णय होणार आहे. (temple authority is thinking to reduce the passes for tulajabhavani mata temple visit)

राज्यात कोरोना संसर्ग वाढला आहे. प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्य लक्षणीयरित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्हा प्रशासन अ‌ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राज्यातील उस्मानाबाद येथील महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावानी मंदिर, कोल्हापुरातील करवीर निवसिनी अंबाबाई मंदिर, पंढपुरातील विठ्ठल-रुक्मीनी मंदिर या ठिकाणी सुद्धा काळजी घेण्यात येत आहे. दर्शनासाठीच्या पासेसची संख्या कमी करणे. दर्शनाची वेळ कमी करणे असे प्रतिबंधात्मक उपाय मंदिर संस्थानाकडून अवलंबिले जात आहेत.

आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पास कमी होण्याची शक्यता

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात राज्यभरातून भाविक येत आहेत. तुळजापुरात गेल्या 4 दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही बाब लक्षात घेता येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शानसाठीचे पास कमी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. तसेच ज्येष्ठ नागरिक व बालकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अंबाबाई मंदिरातील दर्शन वेळ कमी होण्याची शक्यता

कोल्हापुरातील करवीर निवसिनी माता अंबाबाईच्या दर्शनाचीही वेळ कमी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिले आहेत. राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समिती कठोर निर्णय घेण्याचा तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. दर्शनाची वेळ कमी करायची की नाही यावर आगामी दोन दिवसांत निर्णय होणार आहे.

इतर बातम्या :

लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

कोरोनाचा धोका वाढला! तुळजाभवानी दर्शन पासची संख्या निम्म्यावर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

(temple authority is thinking to reduce the passes for tulajabhavani mata temple visit)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.