घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात

महाविकासआघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे (Reduction in Stamp duty of Flat buying ).

घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Follow us
| Updated on: Aug 26, 2020 | 7:39 PM

मुंबई : महाराष्ट्रात आपलं हक्काचं नवं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे (Reduction in Stamp duty of Flat buying ). सध्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे घर खरदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड मंदावला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे याचा साहजिक फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. आर्थिक घडी विस्कटल्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : Maratha Reservation | मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 28 ऑगस्टला, कोर्टात काय काय घडले?

सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या या निर्णयाने घर खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीशी उत्साहाची लाट येऊन आर्थिक घडी पुन्हा बसू शकणार आहे. याच आशेवर सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपात ही स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे.

यानुसार फ्लॅट खरेदी करताना आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 वरुन 2 टक्क्यांवर आली आहे. ही सूट केवळ 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या दरम्यान हीच स्टॅम्प ड्युटी 3 टक्के होईल. यामुळे मंदावलेला रिअल इस्टेट बाजाराला चालना मिळेल अशी आशा सरकारला आहे.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा :

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, नागपूरचे धडाकेबाज महापालिका आयुक्त आता मुंबईत!

सुशांत स्वतः ड्रग्ज घ्यायचा की त्याला दिलं जायचं? सीबीआयचा नोकरांकडे मोर्चा, वॉचमनचीही चौकशी

राष्ट्रवादीकडून गळचेपी, शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांचा राजीनामा

Thackeray Government reduce Stamp duty on Flats Buying

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.