तेव्हा तुम्ही बच्चे होता, बाळासाहेबांचे विचार आम्हाला नका शिकवू; उद्धव ठाकरे यांनी कुणाला सुनावले?
लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी हे विधेयक मुस्लिम समुदायाचे लांगूलचालन असल्याचा आरोप केला आणि भाजपचे "फोडा आणि राज्य करा" हे धोरण असल्याचे म्हटले.

लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. काल मध्यरात्री वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. यावेळी विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडली. तर विरोधात 232 मतं पडली. त्यामुळे लोकसभेत वक्फ संशोधन विधेयक मंजूर करण्यात आले. दुपारी 12 वाजता सादर केलेल्या या बिलावर रात्री उशीरापर्यंत मोठा गोंधळ सुरु होता. अखेर वक्फ सुधारणा विधेयकाच्या समर्थनात 288 मतं पडल्यानंतर वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जाहीर केलं. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी टीका केली.
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वक्फ बोर्डासह, ऑटो टॅरिफ यांसह विविध विषयांवर भाष्य केले. एअरपोर्टसाठी तुम्ही हैदराबादमध्ये जागा घेतली. ती वक्फ बोर्डाची होती. तुम्ही वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का. तुम्हाला जे करायचं ते करत होतातच ना, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी घणाघात केला.
“मुस्लिमांचं लांगूलचालन सुरू होतं”
“तुम्ही हिंदू मुस्लिम करता, मराठी अमराठी करता हे आम्ही सहन करणार नाही. काय खायचं, काय नाही सांगते हे आम्ही सहन करणार नाही. ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही, गद्दारांचं जे म्हणणं होतं आम्ही हिंदुत्व सोडलंय. तर काल मुस्लिमांचं लांगूलचालन सुरू होतं तेव्हा तुम्ही शेपट्या कुठे घातल्या. तेव्हा का बोलले नाही”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“भाजपची नीति फोडा आणि राज्य करा”
“तुम्हाला मुसलमानांचा तिटकारा असेल तर तुमच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा. तुम्ही लावालावी थांबवा. फaटक्याची वात लावायची आणि पळ काढायचा हे सोडा. आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा या ढोंगाला आणि व्यापारी मित्रांना ज्या भूखंड दिल्या आहेत. त्या भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे. काल त्यांनी सूचना त्यांनी घेतल्या नाही. विरोधक हिंदूत्व धार्जिने आणि सत्ताधारी मुस्लिम धार्जिने वाटत होते. अशा पद्धतीने भाजपचे नेते भाषण करत होते. जींनानाही लाज वाटेल अशी भाषणे होते. मुस्लिम समुदायाचा विरोध करावा असं नाही. पण त्यांनी ज्या पद्धतीने समर्थन करत होते, तेच तर लांगूललाचन होतं. काल बिहार आणि बंगाल जिंकण्याची भाषा अमित शाह यांनी केली. भाजपची नीति फोडा आणि राज्य करा अशी आहे”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
“आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका”
“या बिलाचा हिंदुत्वाशी काय घेणंदेणं आहे. मुस्लिमांबाबत सर्व करत आहात. तर मग हिंदूंनी काय गुन्हा केला? मी देवेंद्र फडणवीस यांना विचारतो तुम्ही अटलबिहारी वाजपेयींच्या विचारांवर चालणार, नवाज शरीफांच्या की जिनांच्या? काल जेवढ्या काही चर्चा झाल्या त्यावरून तुम्ही जिनांच्या मार्गावर चालणार आहात का. बाळासाहेबांनी इज्तेमासाठी जागा दिली होती. ती जागा तुमच्या सरकारने ट्रेनने दिली. मंदिर, दर्गा असेल जेवढे लिगल आहेत. त्यांना एक्स्ट्रा एफएसआय द्या असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार समजून घ्या. ते आधी समजून घ्या. तुम्ही बच्चे होता तेव्हा, आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवू नका”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.