देशात मोदींचा चेहरा असला तरी ‘इथं’ माझीच जादू चालणार, ठाकरे गटाच्या खासदाराचा दावा काय ?
उद्धव ठाकरे आणि शिवसेनामुळे इथवर आलो, मी ठाकरे यांची प्रतारना करणार नाही. माझे कर्तव्य आहे मी पाठीशी राहणार असा दावा ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटले आहे.
उस्मानाबाद : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी तूफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा देशव्यापी चेहरा असला तरी उस्मानाबादमध्ये माझीच जादू चालणार असल्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे. माझा छोटा चेहरा असला तरी मतदार माझा विचार करतील असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपला उस्मानाबाद लोकसभा मतदार संघांची जास्त काळजी वाटते. लोक काम पाहून मतदान करतात, जनता माझ्या पाठीमागे कायम उभी राहील, मी प्रामाणिकपणे काम केले. बडेजाव न करता मतदारसोबत अखंडपणे नाते जपले, राष्ट्रवादी सोडून जे भाजपात गेले त्यांच्यामुळे उस्मानाबाद जिल्हा उपेक्षित राहिला. भाजपमध्ये कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही, सत्ता जाते म्हणून ठाकरे यांच्याशी बेमानी करणार नाही. खासदारकीसाठी भाजपने ऑफर दिली तरी भाजपात जाणार नाही असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठासून सांगितलं.
उद्धव ठाकरे आणि शिवसेनामुळे इथंवर आलो. ठाकरे यांची प्रतारणा करणार नाही. माझे कर्तव्य आहे, मी त्यांच्या पाठीशी राहणार असे ते म्हणाले.
तेरणा कारखाना चालू असताना आमदार राणा पाटील यांनी कर्मचारी संप घडवून आणत तो बंद पाडला. कारखाना सुरु होतो याचा आनंद आहे, त्याला विरोध नाही असे स्पष्टीकरण खासदार निंबाळकर यांनी केले आहे.
लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम अजून दोन वर्षे बाकी आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार यांनी केलेल्या डाव्याने राजकीय वातावरण तापले आहे.
राज्यात भाजपाचे राष्ट्रीय नेते येऊन जाहीर सभा घेत आहेत. अशातच देशात मोदींचा चेहरा मोठा असला तरी उस्मानाबादमध्ये माझा चेहरा छोटा असला तर जादू माझीच चालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.