“माझी सुरक्षा काढा, अरे तुझं सरकार आहे काढ ना”; संजय राऊत यांनी सरळ भाजपच्या नेत्याला अंगावरच घेतलं

नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार करत याच नितेश राणेंच्या बोगस कंपन्या असल्याचे सांगत हे शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणाऱ्या यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

माझी सुरक्षा काढा, अरे तुझं सरकार आहे काढ ना; संजय राऊत यांनी सरळ भाजपच्या नेत्याला अंगावरच घेतलं
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 9:40 PM

कोल्हापूरः खासदार संजय राऊत आणि मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद जगजाहीर आहेत. हा वाद चालू असतानाच काल विधानसभेत नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नितेश राणे यांच्याकडून खासदार संजय राऊत यांना धमकी दिली होती. त्यानंतर हा वाद आणखी चिघळला आहे. त्यातच आता खासदार संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

यावेळी संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, नारायण राणे यांचा टिल्लू पोरगं मला धमकी देतंय, की विधानसभेत माझी सुरक्षा काढा, अरे तुझं सरकार आहे काढ ना सिक्युरिटी असं म्हणून त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, सरकार कोणाचं आहे तुमचच सरकार आहे ना मग काढ माझी सुरक्षा असा थेट त्यांनी इशारा दिला आहे.

नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांनी कोकणात नितेश राणे असताना ज्यावेळी शिवसैनिक कोकणात गेले होते. त्यावेळी नितेश राणे यानी स्वतःला कोंडून घेतले होते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नितेश राणे यांच्यावर जोरदार प्रहार करत याच नितेश राणेंच्या बोगस कंपन्या असल्याचे सांगत हे शिवसेना, काँग्रेस आणि आता भाजप असा प्रवास करणाऱ्या यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

निलेश राणे यांच्यासह संजय राऊत यांनी टीका करताना खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव यांना ईडी आणि सीबीआयच्या नोटीस मिळाल्यानंतर यांनी लगेच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांच्या प्रमाणेच मलाही या नोटीस आल्या मात्र मी घाबरलो नाही.

मात्र या नेत्यांना या नोटीस मिळाल्या आणि त्यांना शिवसेनेतून पळून जाण्याचं निमित्तच मिळालं असा खोचक टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.